Jalgaon

?जळगांव Live….कोरोना अपडेट..!जिल्ह्यात 31 मार्च पर्यंत लॉक डाऊन वाढविण्या संदर्भातील नवीन नियमावली जाहीर..!जिल्हाधिकारी राऊत यांनी पारित केले आदेश..!

?जळगांव Live….कोरोना अपडेट..!जिल्ह्यात 31 मार्च पर्यंत लॉक डाऊन वाढविण्या संदर्भातील नवीन नियमावली जाहीर..!

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च,
2020 अन्वये करोना विषाणू (कोकिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे.

शासन आदेश दिनांक 29 जानेवारी, 2021 व या कार्यालयाचे आदेश दिनांक 29 जानेवारी, 2021 अन्वये जळगांव जिल्हयाकरीता लॉकडाऊन कालावधी दिनांक 28 फेब्रुवारी, 2021 पावेतो वाढविण्यात आलेला असून लॉक डाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बन्ध शिथील करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

जळगांव जिल्हयाकरीता लॉकहाऊन कालावधी दिनांक 31 मार्च, 2021 पावेतो बाढविण्यात आलेला असून लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निबंध शिथील करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

आदेश दिनांक 24 फेब्रुवारी, 2021 मध्ये नमूद केल्यानुसार जळगांव जिल्हयाकरीता लॉकडाऊन कालावधी दिनांक 31 मार्च, 2021 पावेतो वाढविण्याबाबत आदेश पारीत करीत आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPS) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निबंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील.
सदरचा आदेश उपोद्घातात नमूद संदर्भ क्र. 09 महाराष्ट्र शासन आदेश दिनांक 24 फेब्रुवारी, 2021 सोबत सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
सदरचा आदेश हा आज दिनांक 01/03/2021 जाहीर केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button