Amalner

?️अमळनेर कट्टा..महत्वाचे…तुम्ही गर्भवती आहात..! तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात..!मग जाणून घ्या लसीकरणाबाबत स्त्री रोगतज्ञ डॉ अपर्णा मुठ्ठे काय म्हणतात..

?️अमळनेर कट्टा..महत्वाचे…तुम्ही गर्भवती आहात..! तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात..!मग जाणून घ्या लसीकरणाबाबत स्त्री रोगतज्ञ डॉ अपर्णा मुठ्ठे काय म्हणतात..
अमळनेर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? पण गोंधळून जाऊ नका. जाणून घ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा मुठ्ठे यांनी दिलीत तुमच्या प्रश्नांची उत्तरं….
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना लस देणे गरजेचे असून त्यासाठी शासन, वैद्यकीय यंत्रणा वेगाने कार्यरत आहे. याचाच एक भाग आता एक मे पासून १८ वर्षांवरील महिलांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे या वयात असणाऱ्या मुली आणि महिलांनी ही लस घ्यावी की नाही, याबाबत असंख्य शंका उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ.अपर्णा मुठ्ठे यांनी दिली आहे.ठोस प्रहारने डॉ मुठ्ठे यांच्याशी संवाद साधला असता..

  • गरोदर महिला कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का?

– नाही. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये,’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये.

  • स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेणे योग्य ठरले का?

– नाही. ‘स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस देऊ नये’ असे केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस घेऊ नये.

  • पीसीओडी, ओव्हरी सिस्ट यांसारख्या समस्या असल्यास लस घ्यावी का?

– आजकाल अनेक मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पीसीओडी, ओव्हरी सिस्टच्या समस्या दिसून येतात. या समस्या खूप दिवसांपासून सुरू असतात. त्यामुळे अशा आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या महिलांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला हरकत नाही.

  • गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांनी महिलांनी लस घ्यावी का?

– गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु गर्भधारणेची तुमची ट्रिटमेट काय आणि कशाप्रकारे सुरू आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • लसीचा एक डोस घेतला आणि त्यानंतर गर्भधारणा राहिल्यास दुसरा डोस घ्यावा का?

– तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसऱ्या डोस घेण्यापूर्वीच्या कालावधीत तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.

  • गर्भवती महिलांनी यासाठी लस घेऊ नये

‘‘मासिक पाळी असली तरी सुद्धा महिलांनी कोरोनाची लस घेण्यास काही अडचण नाही. गर्भवती महिलांना ही लस घेता येणार नाही. गर्भवती असताना अनेक प्रकारच्या लशी टाळण्यात येतात. कोरोनासाठीच्या या लशीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही,’’ अशी माहिती डॉ.मुठ्ठे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button