Aurangabad

दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू…

दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या मजूर पाय घसरून पडल्याने त्याच्या पोटात सळई घुसल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही घटना सोमवारी सकाळी तक्षशिलानगरात घडली. शेख फरहान शेख उस्मान (वय 30, रा. असेफिया कॉलनी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्षशिलानगरातील रहिवासी रिजवाना बेगम यांना त्यांच्या जुन्या घराच्या दुरूस्तीचे काम करायचे होते. हे काम करण्यासाठी त्यांनी शेख फरहान यांना बोलावले होते. कामाचे स्वरूप पाहुन ते कामाचा सौदा करणार होते. आज सकाळी फरहान काम पाहण्यासाठी रिजवानाबेगम यांच्या निवासस्थानी गेला. यावेळी घराच्या पायऱ्या चढत असतांना अचानक पाय घसरून पडला.

यावेळी खाली असलेली उघडी सळई फरहानच्या पोटात खोलपर्यंत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या फरहानला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान फरहानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेविषयी जिंसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button