Pune

?️ अबब..पुणे येथील महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी..जिवंत लोकांना अन्न नाही,कुपोषणात भारत टॉप ला आणि दगडाच्या मूर्तीवर 16 किलो सोने..!

?️ अबब..पुणे येथील महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी..जिवंत लोकांना अन्न नाही,कुपोषणात भारत टॉप ला आणि दगडाच्या मूर्तीवर 16 किलो सोने

पुणे येथील सारस बागेसमोरील अस्तित्वात असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरातील देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी नेसवल्याचा फोटो व्हायरल झाला असून लोकांनी दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केली आहे. यावर आकर्षक नक्षीकाम केलेले आहे.या साडीतील देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी
होते.विशेष म्हणजे ही साडी प्रशासनाकडून सोन्याची साडी परिधान केली जाते.सध्या कोरोनामुळे मंदिरं बंद असले तरी देखील सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे दर्शन भाविकांना ऑनलाइन ने घेता येणार आहे. वर्षातून फक्त दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे.

एकी कडे कोरोना मुळे लाखो लोक रोजगार गमावून उदरनिर्वाह कसा चालवायचा ह्या भ्रांतीत आहेत तर दुसरीकडे एका मूर्तीवर 16 किलो वजनाची सोन्याची साडी चढविली जात आहे. हा मोठा विरोधाभास असून कुपोषणा मुळे हजारो मुले मरत आहेत आणि आम्ही आजही करोडो रु मूर्ती मंदिर,मस्जिद,यावर खर्च करत आहोत..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button