पिराची कुरोली येथील विकास कामाकरता ग्राम संवाद सरपंच संघाचे पदाधिकारी यांनी पालक मंत्री यांची भेट घेतली – सतिश भुई
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई व इतर पदाधिकाऱ्यांनी माननीय नामदार श्री दत्तात्रेय भरणे मामा राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना भेटून पिराची कुरोली तील विविध विकास कामांकरता निवेदन दिले, मौजे पिराची कुरोली येथील लामकाने भुई वस्ती येथे कृषी पंप व घरगुती वापराकरिता एकच विद्युत रोहित्र असुन ते सतत ओव्हरलोड मुळे बिघाड होत असून ते नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे तसेच तसेच कोरोना कालावधीमुळे वस्तीवरील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे बरेचशे विद्यार्थी तसेच बी फार्मसी डी फार्मसी एग्रीकल्चर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत जाणारे विद्यार्थी घरीच अभ्यास करत असल्यामुळे त्यांना विजेच्या सतत गैरसोयींमुळे त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण झाला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे , विजेचा अनियमितपणा व सतत होणाऱ्या रोहीत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून नवीन रोहित्र बसून मिळणे खूप गरजेचे व आवश्यक असल्याने ग्राम संवाद सरपंच संघ या सरपंच संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई व इतर पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांना लामकाने व भुई वस्ती येथे नवीन रोहित्र बसून मिळणे करता निवेदन दिले त्यावर सकारात्मक विचार करून त्यानी लवकरात लवकर नवीन रोहित्र बसून मिळण्याकरता आश्वासन दिले असून तसे अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.