Amalner

?️ अमळनेर कट्टा… ग्रामिण भागापाठोपाठ आमदार अनिल पाटलांनी शहरासाठीही दिली अडीच कोटींची विकास कामे दगडी दरवाजा सुशोभीकरणसाठी 30 लाख,अनेक प्रभागात नवीन रस्त्यांसह होणार भरीव विकासकामे

?️ अमळनेर कट्टा… ग्रामिण भागापाठोपाठ आमदार अनिल पाटलांनी शहरासाठीही दिली अडीच कोटींची विकास कामे दगडी दरवाजा सुशोभीकरणसाठी 30 लाख,अनेक प्रभागात नवीन रस्त्यांसह होणार भरीव विकासकामे
अमळनेर : येथील आमदार अनिल पाटलांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामिण भागात विकास कामांसाठी भरीव असा निधी दिला असताना शहरातही त्यांनी समतोल राखत तब्बल अडीच कोटींची विकासकामे दिली असून यात प्रामुख्याने दगडी दरवाजा बळकटीकरण व चौक सुशोभीकरणसाठी 30 लक्ष निधी आमदारांनी मंजूर केला आहे.
सदर निधीतून विविध प्रभागात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असून यात काही प्रभागात ट्रीमिक्स रस्ते, काही ठिकाणी काँक्रीटीकरण तर काही ठिकाणी रस्ता डांबरीकरणची कामे होणार आहेत, याव्यतिरिक्त काही प्रभागात संरक्षण भिंत, चौक सुशोभीकरण आदी कामे होणार आहे,सदर कामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.शहरातील संपुर्ण प्रभागात गल्लीबोळात विकासकामे देण्याचा प्रयत्न आमदारांचा असून टप्प्याटप्प्याने एकही गल्ली किंवा कॉलनी व परिसर विना रस्त्याचा राहणार नाही असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ही विकासकामे केली जाणार आहेत.
अशी होणार प्रभागनिहाय विकासकामे
प्रभाग क्र.11 अंतर्गत दगडी दरवाजा बळकटीकरण व चौक सुशोभिकरण करणे- 30.00 लाख, अमळनेर शहरात गट नं.905 येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे- 17.00 लाख, प्रभाग क्र.7 अंतर्गत वामन नगर दिपक पाटील ते ढेकुरोड पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 20.00 लाख, प्रभाग क्र.7 अंतर्गत देशमुख मँडम ते अनिल अहिरराव यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र.8 अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर मधील कै.उमाकांत वकील ते विंचुरकर सर यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे-20.00 लाख,
प्रभाग क्र. 8 अंतर्गत श्रीकृष्ण कॉलनी रमण चौधरी ते बन्सीलाल भागवत गुरुजी यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे-10.00 लाख, प्रभाग क्र.8 अंतर्गत माळी सर ते भटू चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे-10.00 लाख, प्रभाग क्र.8 अंतर्गत योगेश हॉटेल ते काटे सर यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र.13 अंतर्गत देशमुख बंगला ते नाग मदिर परिसर पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र.13 अंतर्गत सुर्यवंशी बिल्डींग जवळील शांताराम आधार पाटील ते प्रोव्हीजन पर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकर करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र.17 अंतर्गत विद्याविहार कॉलनीतील विजय वाणी ते सुनिल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 16.00 लाख, प्रभाग क्र.14 अंतर्गत विद्याविहार कॉलनीतील जयंत पाटील ते रविंद्र पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 16.00 लाख, प्रभाग क्र.14 अंतर्गत आर.के.नगर अशोक राणे ते डॉ.आर.एस.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे-17.00 लाख, प्रभाग क्र.14 अंतर्गत आर.के.नगर सगरे साहेब ते जाधव दादा यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे- 17.00 लाख, प्रभाग क्र.1 अंतर्गत रामवाडी भागातील एकनाथ साळुखे ते अनिल राठोड यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 15.00 लाख, प्रभाग क्र. 2 अंतर्गत श्रीराम देवरा ते भाईदास हनुमंत पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र.२ अंतर्गत रामलाल बापुराव ते आसिफ खाटीक यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र. 3 अंतर्गत प्रकाश लांडगे ते रघुनाथ भिका पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 15.00 लाख, प्रभाग क्र. 3 अंतर्गत रावसाहेब पाटील ते राजु पाटील यांच्य घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे- 10.00 लाख, प्रभाग क्र. 10 अंतर्गत रमेश देवरे ते संतोष चिंधा पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोड व गटारी करणे- 10.00 लाख.
एकुण रक्कम 250 लक्ष.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button