Maharashtra

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश…महाराष्ट्र : हवामान विभागाने दिनांक ९ ते १२ जून दरम्यान मुंबई, ठाणे, कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आपत्ती निवारण यंत्रणांनी सज्ज राहून पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.याचपार्श्वभूमीवर तालुका आणि जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहील याची सर्व तालुका स्तरीय खातेप्रमुख आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या काळात झाडे उन्मळून पडणे, झाड्यांच्या फांद्या तुटणे तसेच जीवित व वित्तहानी होणे आदि घटना घडू शकतात याबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी यांना सूचना केल्या. तसेच धोकादायक इमारतीमध्ये राहणारे रहिवासी , कच्ची घरे असणाऱ्या ग्रामस्थांना तात्काळ हालवून इतर ठिकणी तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था करण्याचीही सूचना त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि उपकेंद्रस्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवणे, तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरवरील विद्यूतपुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचेही निर्देश श्री.दांगडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button