Maharashtra

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त युवानेते मंगेश चव्हाण यांच्याकडून फोटोग्राफर बांधवांचा सत्कार

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त युवानेते मंगेश चव्हाण यांच्याकडून फोटोग्राफर बांधवांचा सत्कार 

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त युवानेते मंगेश चव्हाण यांच्याकडून फोटोग्राफर बांधवांचा सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
शब्दांचे सामर्थ्य हे जरी परिणामकारक असले तरी फोटोग्राफी क्षेत्राचे सामर्थ्य त्याहून अधिक बळकट व मोठे आहे. एखादी दृश्य प्रसंग टिपण्यासाठी कॅमेराचा सर्जनशील उपयोग करता येणे ही अत्यंत महत्त्वाची कला आहे.ही कला फोटोग्राफर बांधवांकडे असते. चाळीसगाव तालुक्यातील 50 फोटोग्राफर बांधवांचा मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्फत सिताराम पैलवान मळा येथे सत्कार करण्यात आला. तसेच फोटोग्राफीचे साहित्य ठेवण्यासाठी ची बॅग प्रत्येकाला भेट म्हणून देण्यात आली.

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त युवानेते मंगेश चव्हाण यांच्याकडून फोटोग्राफर बांधवांचा सत्कार
लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी १८३७ मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण सोपे बनले. काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. १९ऑगस्ट १८३७ रोजी फ्रान्स सरकारने या पेटंटची खरेदी केली. या दिवसाची आठवण म्हणून जगभरात जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.
या कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतात मंगेश चव्हाण म्हणाले की, “माझे अनेक फोटोग्राफी करणारे मित्र आहेत. त्याची सर्जनशीलता मी जवळून पाहिली आहे. 1000 शब्दांचे सामर्थ्य एका चित्रामध्ये असते. मी सुद्धा 2000 ते 2002 पर्यंत फोटोग्राफी या क्षेत्रात व्यवसाय केला आहे. कोणीका लॅबचे मालक उमेश महाजन या गोष्टीचे साक्षीदार आहेत. त्यामुळे या क्षेत्राबद्दल विशेष आदर तसेच क्षेत्रातील व्यक्तींबद्दल मनात कायम सन्मानच आहे,” असे मत व्यक्त केले.
तर उपस्थित फोटोग्राफर यांच्यातर्फे ज्येष्ठ फोटोग्राफर श्री.वर्मा यांनी आपल्या मनोगतात खूप गमतीशीर किस्से सांगितले. ते म्हणाले की, “मी गेल्या चाळीस वर्षापासून फोटोग्राफी करत आहे. चाळीस वर्षात अनेक चांगले वाईट अनुभव आले.काहींना मुलगा झाल्यावर त्यांनी लग्नाचे फोटो नेले तर काही अजुनही फोटो घ्यायला आलेले नाहीत. वास्तविक फोटो हे साधन आहे आपल्या आठवणी, आपल्या स्मृती जपून ठेवायचे. मोबाईल आला म्हणजे फोटोतल्या स्मृती मनात उमटताच असे नाही. असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ फोटाग्राफर साळी साहेब, सोनार काका, वर्माजी, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण व हर्षल पाटील आदी उपस्थित होते, तर सुरेश जी वर्मा, भालचंद्र दाभाडे, भूपेंद्र शर्मा, महेंद्र जाधव, निलेश चौधरी, प्रताप भोसले, निखिल महाजन, मनोज शिंपी, मनोज चौधरी, अनिकेत जाधव, गोपाल वाणी, योगेश पाटील, बाबाजी डोके, अंकुश राठोड, हेमंत शिरोडे, राजेंद्र शिंपी, मिलिंद झाल्टे, भगवान पाटील, विलास भोई मेहुणबारे, देवेंद्र गवळी, प्रशिक चव्हाण, प्रकाश पाटील, अंकुश, सुनील सोनवणे, मंगेश कुमावत, सूर्यकांत देशमुख, प्रदीप शिरसाठ, जितेंद्र गांगुर्डे, सतीश ढोले बहाळ आदी छायाचित्रकार हि उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन योगेश खंडेलवाल यांनी केले तर आभार दिनेश माळी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button