Amalner

?️अमळनेर कट्टा..Crime…आंतरजातीय विवाह केला म्हणून आदिवासी युवकावर प्राण घातक हल्ला..!

?️अमळनेर कट्टा..आंतरजातीय विवाह केला म्हणून आदिवासी युवकावर प्राण घातक हल्ला..!

अमळनेर येथील निंभोरा या गावात आंतरजातीय विवाह केला म्हणून आदिवासी तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना निंभोरा ते अमळगाव रस्त्यावर ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निंभोरा येथील रहिवासी अश्विनी पाटील या तरुणीने खुशाल राजेंद्र पारधी याच्याशी कायदेशीर रित्या विवाह केला.पण ही गोष्ट गावातील काही लोक व इतरांना आवडलेली नव्हती.या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी निखिल शेखर पाटील (रा. अमळगाव ) याने निंभोरा येथे अश्विनीच्या घरासमोर जाऊन तू पाटील समाजाची असून आदिवासी जातीच्या तरुणाबरोबर विवाह का केला?आम्ही नव्हतो का? आदिवासी पोरगाच बरा तुला सापडला लग्न करायला? तुझ्या नवऱ्याला मारून टाकू अशी धमकी दिली होती.

त्यानंतर काल दि ८ रोजी सकाळी १२ वाजता अश्विनीचा पती खुशाल पारधी अमळगावकडे जात असता निखिल शेखर पाटील व हेमंत शेखर पाटील हे अमळगाव
कडून मोटरसायकलवर आले व खुशालला अडविले. हेमंतने खुशालला धरून ठेवून निखिलने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मारून पळून गेले.

गावातील गणेश पारधी, सागर पारधी, हरीष पारधी, संदीप पारधी यांनी खुशालला
अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक गानार करून खूशालची प्रकृती गंभीर असल्याने त्या
रुग्णवाहिकेने धुळे रवाना केले. फिर्यादीवरून निखिल व हेमंत विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा 98/21 भादंवि 326 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सफौ 1811 किशोर पाटील हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button