Latur

कोरोना लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त घरोघरी पापडं, कुरडया शेवया बनवण्याची लगबग..

कोरोना लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त

घरोघरी पापडं, कुरडया शेवया बनवण्याची लगबग

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला दिसून येत आहे.त्यातच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.
आणि कोरोनाच्या धास्तीने मुलं मुली लहान थोर घरीच आहेत.त्यामुळे घरकामात मदत व्हावी म्हणून सर्व सदस्य मिळून पापडं, डाळी, कुरडया ,चिप्स, सांडगे आदी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात व्यस्त आहेत.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला आपल्या घरासमोर पदार्थ करताना दिसत आहेत.

दरवर्षी गावागावात उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात घरगुती वापराचे आवश्यक खाद्यपदार्थ बनवले जातात,मात्र कोरोना संचारबंदी मुळे लॉकडाऊन पाळण्याने गावागावांमध्ये महिला वर्गातून खाद्यपदार्थ बनवण्याची लगबग दिसून येत आहे.रांगोळी काढल्याप्रमाणे उन्हाळी पदार्थ वाळण्यासाठी ठेवले जात आहेत.
महिला मुली या सर्वांच्या पुढाकाराने ज्वारी,उडदाचे, तांदळाचे पापडं, आणि सांडगे ,तांदूळ ,गव्हाच्या कुरडया,पापड्या ,शेवया आदी पदार्थ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आणि कोरोना सुरक्षितता पाळून बनवले जात आहेत.

सध्या लॉकडाऊन संचारबंदी सुरू असल्याने घरातील प्रमुख मंडळीं व पुरुष मंडळी घरीच असल्याने महिला मंडळींना या घरकामात हातभार लावत आहेत.
सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील महिला शेवया, पापड, सांडगे, कुरड्या यासारख्या कामांत मग्न आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणामुळे महिलांची कामे कमी कष्टाची व कमी वेळेत होत असल्याने महिलांच्या कामात सुलभीकरण झाले असले तरी हातांनी बनविलेल्या पदार्थांची चव काही औरच असल्याने उन्हाळी कामे घरीच करण्यावरच महिलांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे अचानक निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे केलेले पदार्थ वाळवण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button