Maharashtra

नगरसेवक यांनी आपल्या वार्डात केली सॅनिटायझरची फवारणी

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

सध्या जगभर सुरू असलेल्या कोरणा रोगाने चांगलेच थैमान घातले असताना शासन स्तरावर सर्वतोपरी उपाय केले जात आहेत.यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून पारोळा गावातील नगरसेवक श्री कैलास चौधरी व मित्र परिवार यांनी एकत्र येऊन गावातील वार्ड क्रमांक ४व५ मध्ये फवारणीचे पंप पाठीवर घेऊन फवारणीचे काम केले याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारोळा येथील वार्ड क्र. 4 चे नगरसेवक कैलास आनंदा चौधरी यांनी स्वखर्चाने सॅनिटीझर आणून वार्डातील मित्राच्या साहाय्याने प्रकाश चौधरी, सोनू चौधरी व मित्र मंडळी या तरुणांनी कोरोना रोगाला आळा बासावा म्हणून आपल्या वार्डात आपापल्या घरातील फरावणी पंपाच्या साहाय्याने टी. सि. एल. पावडर, सॅनिटीझर पाण्यात मिसडून भवानी चौक, आझाद चौक, शिवाजी विभाग, शेवडी गल्ली, लोहार गल्ली, हत्ती मंदिर परिसरात फवारणी केली. साड्या जगभर कोरोना रोगाने थैमान घातले असतांना शासन , नगर पालिका, ग्राम पंचायत व सर्व शासकीय कर्मचारी सर्वोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यातच गावातील या तरुणांनी व नगर सेवकाने केलेल्या फवारणीचे वार्डात व गावात चांगलेच कौतुक होतआहे आपल्या कडून जो पर्यंत शक्य होईल तो पर्यंत गावकर्यांना आपण मदत करू असे नगरसेवक कैलास चौधरी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button