Faijpur

देशपातळीवरील ट्रेड युनियनच्या संपास धनाजी नाना महाविद्यालय एन्मुक्टो शाखेचा पाठिंबा

देशपातळीवरील ट्रेड युनियनच्या संपास धनाजी नाना महाविद्यालय एन्मुक्टो शाखेचा पाठिंबा

सलीम पिंजारी

दि. 7-8 डिसेंम्बर रोजी भुवनेश्वर येथे अखिल भारतीय प्राध्यापक महासंघ (AIFUCTO)ने व दि.5 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (MFUCTO) ने पारित केलेल्या ठरावानुसार देशातील ट्रेड युनियन अंतर्गत येणाऱ्या सर्व कामगार संघटनांनी दि. 8 जानेवारी 2020 रोजी देशपातळीवर केंद्र सरकारच्या सद्य धोरणाविरोधात संप पुकारलेला आहे. या संपास धनाजी नाना महाविद्यालय एन्मुक्टो स्थानिक शाखेने आपला पाठिंबा दिला आहे.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले .केंद्र सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस सामान्य जनतेचे अवघड होत जाणारे जगणे, किमान वेतन कायद्याची न होणारी अंमलबजावणी,समान काम समान वेतन धोरण व जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत उदासिनता , अर्धवेळ/ ठोक वेतन/तदर्थ भरती बाबतचे कामगारविरोधीधोरणांचा निषेध म्हणून,तसेच,सामाजिक सुरक्षितता निर्माण करावी यासाठी हा संप आहे, ट्रेड युनियनच्या संपात एन्मुक्टो काळ्या फिती लावून सहभागी झाली.

स्थानिक शाखेतील पदाधिकारी व सदस्यांनी ८जानेवारी २०२० रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले,आणि जिल्ह्यात ट्रेड युनियन द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या निदर्शनात/ मोर्चात/धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
यात प्रा डॉ सतीष चौधरी, प्रा डॉ आर पी महाजन, प्रा डी बी तायडे, प्रा एम एन राणे, प्रा डॉ पंकज सोनवणे, प्रा डॉ आर एन केसुर, प्रा हरीश नेमाडे यांनी सहभाग नोंदविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button