Pandharpur

सामान्यांची वीज तोडणारे राज्यातील जुलमी सरकार : दिलीप धोत्रे

सामान्यांची वीज तोडणारे राज्यातील जुलमी सरकार :दिलीप धोत्रे


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : राज्याचे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विज बिल कमी करू. दुरुस्त करू अशी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात सामान्यांची वीज तोडणी सुरू आहे. वीज तोडणारे हे राज्यातील जुलमी सरकार आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आसुड ओडून महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांनी दिली. टाळेबंदी नंतर सामान्यांना आलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्यात यावे. तसेच वीज बिल थकबाकीपोटी वीज तोडण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. त्यामुळे वीज तोडणी त्वरित थांबवावी अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात महावितरणच्या कार्यालयासमोर भव्य आसुड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन देखील देण्यात आले. कोरोना सारख्या टाळेबंदीच्या काळामध्ये सामान्यांना मोठ्या प्रमाणावर वीज बिले आली. यानंतर ऊर्जामंत्री यानी वीज बिल माफ करू. तीन टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची सवलत देऊ. अशी घोषणा केली. मात्र ऊर्जा मंत्र्यांची घोषणा फोल ठरली. ऊर्जा मंत्री यांनी महाराष्ट्राला फसवल आहे. कारण सध्या प्रत्यक्षात सामान्यांची वीज तोडणी होत आहे. त्यामुळे महावितरण जनसामान्यांच्या जीवावर उठत असेल तर वीज तोडणीसाठी येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कायदा देखील हातात घेतला जाईल. असा इशारा यावेळी धोत्रे यांनी दिला. तसेच महावितरण कंपनीकडून तात्काळ वीज बिल माफी द्यावी. सामान्यांच्या घरावर वीज तोडणी करण्याची कारवाई देखील त्वरित थांबवावी. अन्यथा मनसे स्टाइल उत्तर दिले जाईल. असेही या निमित्ताने धोत्रे यांनी निवेदनाच्या माध्यमातून कळवले आहे . या आंदोलनाच्या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर , शशिकांत पाटील ,अनिल केदार, भालचंद्र गोडसे ,अक्षय विभुते, अजिंक्य तोडकरी , विशाल गोडसे, खंडू इंगोले ,कृष्णदेव इंगोले , नागेश इंगोले , तेजस गांजले, शुभम काकडे यांच्यासह शेकडो मनसैनिक आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button