Rawer

सावखेडा,चिंचाटी परिसरात अवैध धंद्यांना ऊत,पोलीस प्रशासन मुक

सावखेडा,चिंचाटी परिसरात अवैध धंद्यांना ऊत,पोलीस प्रशासन मुक

ता. रावेर।वार्ताहार-

रावेर तालुक्यातील गावागावात पोलीस सध्या लॉक डाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना नियमांचा पाढा वाचून दाखवितात, मात्र अवैध धंद्यावाल्यांना खुली मोकळीक दिली जात असल्याने नागरिकांमध्ये सावदा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खिरोदा, सावखेडा,चिंचाटी,परिसरात पेट्रोलिंग साठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या भूमिका बाबतीत तीव्र नाराजी सदर शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्याने सहजपणे मिळणारा गुटखा, तंबाखू व दारू सर्वत्र दुर्मिळ झाली आहे व त्यामुळे त्याची वाढती मागणी आणि अवैध बाजारात वाढलेले गगनचुंबी दर बघता चढ्या दराने विक्री सुरू आहे. गावठी दारू तर सर्रासपणे गल्ली- बोळांमध्ये व तीही चढ्या दराने विक्री होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.

जिल्ह्याभरात पोलीस कौतुकास्पद कामगिरी बजावत असताना अनेक ठिकाणी गावठी दारूचे अड्डे पोलिसांकडून उध्वस्त केले जात आहे. मात्र खिरोदा,सावखेडा,चिंचाटी,या भागात गावठी दारु विक्रेत्यांना पोलिसांचे भय का वाटत नाही ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे ? असलेल्या पोलिसांच्या अशा वागण्याने संपूर्णपणे शेतकरी वर्ग, महिला शेतमजूर हे धास्तावले आहेत,कारण शेतात दिवसाढवळ्या हे जुगारी मोठ्या संख्येने , मद्यधुंद अवस्थेत असतात, व त्यांची भाषा आणि नजर हि विशेष करून शेतमजूर महिला साठी, शंभर टक्के दुरव्यवहाराची वाटते, म्हणून महिला संरक्षणासाठी आणि शेतकरीही या जुगारी,दारुदारूडयांना वैतागले आहेत, या जुगारी,दारूडयांकडून मका,केळी, सह अन्य पिकांच्या नासधूस, मोठ्या प्रमाणात मुद्दाम हून हे जुगारी मोठ्या प्रमाणात नुकसान करून जुगारी आपली दहशत निर्माण करीत आहेत, तरी पोलीस प्रशासन डोळे मिटून मुक झालं आहे, अशी चर्चाही पंचक्रोशीतील शेतकरी, महिला मजूर, सह सामान्य नागरिकांत होत आहे,

खिरोदा,सावखेडा चिंचाटी या परिसरात अवैध धंद्यांना ऊत आल्याने रावेर तालुक्यातील सक्षम, आदर्श लाॅक डाऊन ला नक्कीच गालबोट लागू शकते,
तरीही संबंधित अधिकारी व प्रशासन प्रणाली यांनी ठोस कारवाई जुगारी, दारूबंदी वर करण्यात यावी, अशी आशा संबंधित सामान्य जनतेच्या मनात आहे, या पोलीस प्रशासन कितपत जागे होऊन कोणती कारवाई करेलं , हे पाहणे रहस्यमय ठरले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button