Thane

फटाके टाळा व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावादिवाळी सण साधेपणाने साजरा करा- जिल्हाधिकारी..

फटाके टाळा व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावादिवाळी सण साधेपणाने साजरा करा- जिल्हाधिकारी..

प्रतिनिधी :

ठाणे : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गणेशोत्सव,ईद नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही साधेपणाने साजरा करावा.नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.तसेच जिल्हावासियांना प्रकाशपर्व दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव मानला जातो. मात्र, या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या स्थितीत करोना बाधित रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा अधिकच त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

नागरिकांनी अन्य सण-उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन दिपावलीचा सण साधेपणाने साजरा करावा.
उत्सव काळात विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. करोना संक्रमण वाढणार नाही याची काळजी घ्यावी

राज्य सरकारने दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्यासाठी सांगितले आहे.. या सर्व सुचनांचे पालन करावे व कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button