Faijpur

न्हावी येथे कोरोनाचा शिरकाव

न्हावी येथे कोरोनाचा शिरकाव

सलीम पिंजारी

फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी तालुका यावल तभा वृत्तसेवा दि ११ येथील न्हावीच्या कुंभारवाडयात कोरोनाने शिरकाव केला.
गेल्या अडीच महिनेमपासून न्हावी मध्ये प्रशासन ,ग्रामपंचायत, स्वयंसेवक व गावकर्याच्या सहकार्याने अत्यंत शिस्तप्रिय लोकडाऊन पाळला जात होता. कुंभारवाडयतील राहणार 38 वर्षीय किराणा दुकानदार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात खडबड उडाली तसेच दुकानातील 4 कर्मचारी आई व पत्नी याना विलीगिकर्ण कक्षेमध्ये कोरोंटाईन करण्यात आले असून पॉझिटिव्ह व्यक्तीस कोविड 19 जे टी एम ला हलविण्यात आले व प्रशासनाचे अधिकारी लगेच परिसरात येऊन संपूर्ण परिसर कुंभारवाडा,राधे राधे चौक हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला.तसेच कुटुंबातील 11 जणांची थर्मल टेस्ट घेऊन त्यांना होम कोरेन्टीन करण्यात आले.तसेच संपूर्ण परिसर सेनेटाराईज करण्यात आला. पॉझिटिव्ह व्यक्तीचे किराणा दुकान व गोडाऊन याना पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे.

प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील, सरपंच भारती चौधरी,मेडिकल ऑफिसर डॉ फिरोज तडवी,ग्राम विकास अधिकारी के आर देसले,तलाठी लीना राणे,पोलीस पाटील संजय चौधरी,डॉ महाजन,बोरखेडा ग्रामसेवक हितेश महाजन, माजी उपसरपंच व न्हावी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले , रवींद्र तायडे व ग्रामपंचायत , तलाठी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असून कोरोना प्रसारण होऊ नये यासाठी होमकोरोन्टीन करून घ्यावे असे प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

न्हावी येथे किराणा दुकानाला सिल करतांना तलाठी लिना राणे ग्रामसेवक के. आर .देसले सरपंच भारती चौधरी ,पोलीस पाटील संजय चौधरी ,ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले, रविंद्र तायडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button