Pandharpur

कोरोना बाबत निष्काळजीपणाचा झाला कळस, पॉझिटिव्ह असल्याचे लपवले, गुपचूप घरात थांबले,मात्र पोलिसांनी कारवाई करून कोविड सेंटर मध्ये पाठवले

कोरोना बाबत निष्काळजीपणाचा झाला कळस, पॉझिटिव्ह असल्याचे लपवले, गुपचूप घरात थांबले,मात्र पोलिसांनी कारवाई करून कोविड सेंटर मध्ये पाठवले
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : कोरोना बाबत निष्काळजीपणाचा झाला कळस, पॉझिटिव्ह असल्याचे लपवले, गुपचूप घरात थांबले,मात्र पोलिसांनी कारवाई करून कोविड सेंटर मध्ये पाठवले
जाधववाडीत ९ जणांवर गुन्हे दाखल
करकंब,टीम—देशात कोरोनची दुसरी लाट आल्यापासून माणसांचे जीवन असह्य होत असताना ही साखळी तोडण्यासाठी सर्वच स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत,मात्र अशातही कोरोनाचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारविना घरातच थांबल्याचा धक्कादायक प्रकार करकम्ब ता.पंढरपूर येथील जाधववाडी गावात घडला असून याची माहिती पोलिसांना मिळतात खबरदारी म्हणून या ९ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह ९ रुग्ण कोणताही उपचार न घेता, कोविड सेंटरमध्ये न जाता हे लोक घरी बसून असल्याची माहिती गावचे सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडून करकंब पोलिसांना मिळाली.तेव्हा तात्काळ परिस्थिती चे गांभीर्य ओळखून गावातील प्रतिष्ठित नागरिक ,ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य अधिकारी रोपळे यांच सह करकंब पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी खात्री करून पोहेकॉ रमेश फुगे, पोनासचिन गावडे व सहकारी स्टाफ सह जाधववाडी कडे धाव घेतली . बेजबाबदार व कोरोना वाढीसाठी कारण ठरत असलेल्या सर्व ९ रुग्णावर पोना सचिन गावडे यांनी 159/2021 भा. द.वि.कलम 188,270 सह साथ रोग प्रतिबंसाधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन नुसार गुन्हा दाखल करून त्यांना आष्टी येथील कोविड सेंटर मध्ये दाखल केले आहे.या घटनेचा पुढील तपास सह.पोलीस निरीक्षक शिंदे हे करीतआहेत.माननीय जिल्हाधिकारी यांनी घरांमध्ये उपचाराकरता विना परवानगी थांबता येेनार नाही अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे.यापुढे करकंब पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरात उपचाराकरता थांबलेले दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सध्या जे कोणी घरात उपचार घेत असल्यास त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटर अगर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये भरती होऊन शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन करकम्ब चे सहा.पोनी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button