Patur

बिरसा क्रांती दल पातुर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला

बिरसा क्रांती दल पातुर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला

विलास दोघडे

पातुर शहरांमध्ये तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते यांनी शिवनगर मुंगसाजी महाराज मंदिर येथे मुंगसाजी महाराज च्या प्रतिमेचे पूजन करून व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार व पूजन करून करून जागतिक आदीवासी दिवस साजरा केला . यावेळी पातुर तालुक्यातील झरंडी, आलेगाव, पाचरन, चोंडी अंधारसांगवी, गोंधळवाडी, सावरखेड, कोसगाव, चिंच खेड, येथून बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, आणि समाज बांधव हजर होते तसेच बिरसा क्रांती दल ता.प्रमुख रामचंद्र लोखंडे, तालुका उपप्रमुख विलास धोंगडे, रुस्तम धंदरे , गुलाबराव वानखडे, सदाशिव लोखंडे, आदी मान्यवर उपस्थित होते, देवा ग्रुप फाउंडेशन चे तालुका पातुर तालुका अध्यक्ष, सम्राट तायडे, छोटू शिंदे, श्याम बोंबटकार, ऋषभ गायकवाड, देवा दशवंत राव, प्रदीप चव्हाण यांनी परिश्रम घेतले

विलास धोंगडे
प्रतिनिधी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button