मालेगाव

नांदगाव तालुक्यात विकासाची घोडधोड सुरू – आमदार सुहास ( आण्णा) कांदे

नांदगाव तालुक्यात विकासाची घोडधोड सुरू – आमदार सुहास ( आण्णा) कांदे

मनोज भोसले
मालेगाव – मनमाड – कोपरगाव रस्ता प्र.रा.मा.८ वरील कि. मी.१२७/९६० मध्ये पांझन नदीवरील जुन्या पुलाचे पुनर्वसन करणे या कामाचे लोकार्पण सोहळा
आमदार श्री.सुहास (आण्णा) कांदे,
यांचे शुभहस्ते आज संपन्न झाला सदर पुलाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे सदर पुल सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत होईल या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
व नांदगाव तालुक्यात असाच विकासाचा झंझावात सुरू असावा तालुका हा विकासा पासून दूर होता आमदार श्री.सुहास (आण्णा) कांदे,यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा जो काही कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.या वेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक माजी आमदार राजाभाऊ देशमुख मनमाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.पद्मावतीताई धात्रक,गणेशभाऊ धात्रक,गंगादादा त्रिभुवन,आफजलभाई शेख,शहराध्यक्ष रविंद्र घोडेस्वार,राजेंद्र पारीख,निलेश इंगळे,संतोष अहिरे,संतोषभाऊ बळीद,राजाभाऊ भाबड,शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे आदी सर्व उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button