Paranda

अंभीचे सहाय्यक पोलीस निरीक्षकास निलंबीत करण्याची मागाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्सास मारहाण प्रकरणी

अंभीचे सहाय्यक पोलीस निरीक्षकास निलंबीत करण्याची मागाणी

प्रहार संघटनेच्या कार्यकर्सास मारहाण प्रकरणी

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.२०

जमीनीच्या वादातुन नातेवाईकानी मारहाण केल्याची फिर्याद देण्यासाठी अंभी पोलीस ठाण्यात गेलेल्या सक्करवाडी तालुका परंडा येथील प्रहार व मानवधिकार संघटनेचे कार्यकर्ते तय्यब शेख याची फिर्याद न घेता त्यालाच आत घालीन जातो का निघुन असे म्हणत सपोनि पालवे जी .बी . कानशीत जोरात मारले .

या घटनेचा निषेद करीत प्रहार व मानवधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यानी सोमवार दि २० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकराणातील दोषी अधिकाऱ्यास निलंबीत करण्याची मागणी केली आहे या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार डॉ .तुषार बोरकर यांना दिले आहे .

या घटनेचा निषेध करीत प्रहार संघटनेचे व मानवधिकार संघटनेच्या कार्यकत्यांनी अंभीचे सपोनि पालवे जी .बी.यांना निलंबीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे .

प्रहार संघटना व मानवधिकार सघटनेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत .जमीनीच्या वादातुन नातेवाईकानीच मला लाथा बुक्या काट्याने मारल्याने माझ्या डोक्याला जबर मार लागल्याने मला माझ्या घरच्यानी शेळगाव येथील प्राथमिक उपकेंद्रात प्रथम उपचारासाठी दाखल केले . डोक्याला मार लागल्याने पुढील उपचारासाठी धाराशिवच्या सरकारी दवाखाण्यात जाण्यासाठी लेखी पत्र दिले .

जाताना अंभी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन जावे म्हणुन मी अंभी पोलीस ठाण्यात गेलो असता .सपोनि पालवे जी .बी. यांनी मलाच अर्वच्छ भाषेत शिवीगाळ केली . तु कसला कार्यकर्ता आहे तुझ्या सारके लई बघीतले निघ येथुन नाही तर तुलाच आत घालीन असे म्हणत कानसोलीत चापटा मारल्या त्याची फिर्याद तर घेतलीच नाही . शेख हे आधी धाराशिवच्या सरकारी दवाखाण्यात गेले तेथील डॉक्टरानी त्याला दोन दिवस अॅडमीट करून घेऊन त्याच्यावर उपचार केले .

ग्रामीण भागात प्रहार संघटना मानव अधिकार संघटेनेचे तय्यब शेख यांनी अंभी पोलीस ठाण्यात माहितीचा एक अर्ज दिला होता . त्याचा राग मनात धरून सपोनि पालवे यांनी मारहाण केली आहे.
या घटनेचा निषेध करीत संघटनेच्या कार्यकार्यानी गृहमंत्री , पोलीस अधिक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी तहसीलदार डॉ . तुषार बोरकर यांना तक्रारीच्या प्रति देण्यात आल्या आहेत . या तक्रारीवर आरटीआयचे तालुकाध्यक्ष, फारुक शेख , दिनेश गुडे , इकबाल शेख , गौस शेख , अकबर शेख , निसार हावरे , उत्तरेश्वर ठवरे , बालाजी गवारे , नुरजहाँ शेख , सुदामती काकडे , हरिश्चंद्र सुकडे , सिकंदर पठाण ,वच्छला काकडे , इरफान शेख , बिलाल शेख, अब्दुल पठाण यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button