Chimur

संविधान जनजागृती ही काळाची गरज : दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे

संविधान जनजागृती ही काळाची गरज : दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे
मुलींची निवासी शासकीय शाळेत संविधान जनजागृती कार्यक्रम

चिमुर/प्रतिनिधी –

ज्ञानेश्वर जुमनाके

भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे. भारतीय संविधान हे जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते. लोकशाही ज्यावर उभी आहे, ती घटना म्हणजे भारतीय संविधान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार. भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे. संविधानाची पायाभूत मूल्ये न्यायपालिकेने जपलीच पण ती लोकांमध्ये-नागरी समाजातही रुजायला हवीत. संविधान जनजागृती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चिमुर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे यांनी व्यक्त केले.
ते तालुका विधी सेवा समिती, तालुका अधिवक्ता संघ, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, संत भय्यूजी महाराज विद्यालय, न्यु राष्ट्रीय विद्यालय, मुलींची निवासी शासकीय शाळा यांचे संयुक्त विद्यमाने मुलींची निवासी शासकीय शाळेत दि. ३१ जानेवारीला आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमुर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश रवींद्र भेंडे यांचेसह प्रमुख अतिथी म्हणुन चिमुर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. रघुनाथ सोंडवले, नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वाघधरे, न्यु राष्ट्रीय विद्यालयाच्या डॉ. अश्विनी रोकडे, आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. संजय पिठाळे, मुलींची निवासी शासकीय शाळेच्या मुख्याधापिका मेश्राम, संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या पाटील, चिमुर तालुका बार असोसिएशनचे महेशदत्त काळे, जे. डी. मुन, नवयुग कामडी, मधुकर लांबट, गुणवंत अगडे, गुरपुडे, नितीन रामटेके, शैनेशचंद्र श्रीरामे, धनराज वंजारी, संजीवनी सातरडे, ललीत हलमारे, सुभाष नन्नावरे, संजय पाटील, रणजीत रामटेके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात चिमुर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. रघुनाथ सोंडवले, नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वाघधरे, न्यु राष्ट्रीय विद्यालयाच्या डॉ. अश्विनी रोकडे, आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. संजय पिठाळे, मुलींची निवासी शासकीय शाळेच्या मुख्याधापिका मेश्राम, संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या पाटील आदीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान शहरातील मुख्य मार्गाने संविधान जनजागृती रँली काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहायक अधिक्षक राखुंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार न्यायालयाचे कर्मचारी विदोलीकर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button