Chandwad

चांदवड दुर्गभ्रमंती सदस्यांचा निसर्ग सानिध्यात अनोखा मैत्री दिवस

चांदवड दुर्गभ्रमंती सदस्यांचा निसर्ग सानिध्यात अनोखा मैत्री दिवस

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरातील दुर्गभ्रमंती सदस्य आज सुट्टी असल्याने व पावसाची रिमझिम असल्याने मैत्री दिनाच्या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात चोरचावडी धबधबा चांदवड डोंगररांग या परिसरात गेले होते.यावेळी ग्रामसेवक प्रकाश सूर्यवंशी व आदीवासी नेते संजय (बाळा)पाडवी यांनी सर्व सदस्यांना रानभाज्या, वेल, तसेच निसर्गातील काही पावसाळ्यात येणाऱ्या वनस्पतीची फुले याबद्दल माहिती दिली.दुर्गभ्रमंती सदस्यांचा वाढदिवस सुद्धा एखादा किल्ला किंवा निसर्गरम्य ठिकाण घेऊन तेथील देवदेवतांच्या मंदिरात आरती,पूजा करून साजरा केला जातो.जगाला स्वच्छता व निसर्ग जपण्याचा संदेश सदस्य देत असतात.यावेळी श्री प्रा डॉ शिंदे सर,श्री सुताने सर,जितेंद्र डाके,उदय वायकोळे, किसना शिंदे,बालक राम शिंदे,सिद्धी डाके इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button