Mumbai

मेघा डोळस – समाजसेवीकेचे व्रत यशस्वीपणे जोपासणारी एक नाट्यवेडी अभिनेत्री …!

मेघा डोळस – समाजसेवीकेचे व्रत यशस्वीपणे जोपासणारी एक नाट्यवेडी अभिनेत्री …!

राहुल खरात

मेघा डोळस सिने नाट्य सृष्टीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व जिने संसारिक प्रपंचाबरोबर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून आपल्या भूतकाळातील अघटीत घटनेचा बाऊ न करता केवळ दुःख पोटात ठेऊन ” तेजस फ़िल्म फाउंडेशन” ही संस्था उभारली., उद्देश इतकाच की या फाउंडेशन च्या माध्यमातुन हौशी कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्द्ध करून देऊन त्यांना नावलौकिक मिळवून देणे. आजवर मेघा डोळस यांनी संस्था स्थापनेपूर्वी मराठी सिनेमा “गांव तिथे राव” या व्यावसायिक मराठी चित्रपटात भूमिका केली त्याचबरोबर “माई” , “स्वच्छता भारत अभियान” या लघू चित्रपटामध्ये ही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.तसेच एकांकिका ” मला आई पाहिजे” आणि “कॉमेडी चेटकिण” यांमध्ये आपली अभिनय चुणूक दाखविली आहे.
इतकंच नव्हे तर जाहिरात आणि “भूताची रात्र” या वेब सिरीज च्या दुनियेत ही आपली झलक दाखवुन आपण एक यशस्वी अभिनेत्री आहे हे दाखवुन दिले.
मेघा डोळस यांच्या सर्वतोपरी कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य स्तरांवर “उपाध्यक्षा” म्हणुन नियुक्ती करून त्याना पद बहाल केलं. सध्या मेघा डोळस हे आपल्या तेजस फ़िल्म फाउंडेशन अंतर्गत सातत्याने आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सव आयोजीत करत आहेत आणि यंदा चे हे चौथे वर्ष असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाला नक्की यश मिळो हीच नटेश्वर चरणी सदिच्छा…!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button