Amalner

?️ अमळनेर कट्टा… शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरू, आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ.

?️ अमळनेर कट्टा… शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरू, आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ.

अमळनेर : गुरूवारी केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेत अंतर्गत नाफेड अंतर्गत हरभरा या धान्याचे शासकीय खरेदी केंद्र येथील शेतकी संघाकडून धुळे रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात सुरू झाले आहे. सकाळी 11 वाजता काटापूजन व पहिल्या शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व विधिवत पूजा करून ही खरेदी सुरू करण्यात आली.
यापूर्वीच शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी या संबंधित केंद्रात करून घेतली असून त्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे.

त्याप्रसंगी शेतकी संघाचे प्रशासक गणेश महाजन, व्यवस्थापक संजय पाटील, पाहिले शेतकरी देविदास बळीराम पवार पातोंडा, मनोहर पाटील गांधली, वखार महामंडळचे कैलास बोरसे, संघाचे कर्मचारी सुभाष पाटील, भटू पाटील, भिकन पवार उपस्थित होते हरभरा खरेदीसाठी 1100 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे हमीभाव 5100 रुपये आहे.

सध्या कोरोना असल्याने बाजार समितीत आवक मोठी वाढली आहे. बाजार समिती यामुळे शासकीय खरेदीत नावे नोंद केलेल्या शेतकऱ्यांची हरभऱ्याची प्रचंड आवक वाढेल. यामुळे बाजार समितीच्या खरेदीदारांवर दबाव येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळेल व बाजार समितीत हरभरा भाव देखील वधारतील यासाठी हे खरेदी केंद्र सुरू आहे. 24 एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे.

?️ अमळनेर कट्टा... शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी सुरू, आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button