Mumbai

?️अमळनेर कट्टा…दिलासादायक..एम. पी. एस. सी. परीक्षा पास विद्यार्थ्यांना अखेर न्याय..! रिक्त पदांवर नियुक्ती मिळणार ….!!

?️अमळनेर कट्टा…एम. पी. एस. सी. परीक्षा पास विद्यार्थ्यांना अखेर न्याय..! रिक्त पदांवर नियुक्ती मिळणार ….!!

एम. पी. एस.सी. च्या रखडलेल्या परीक्षा त्वरित घेवून उर्वरीत विद्यार्थ्यांना ही न्याय मिळावा…मागणी
अमळनेर महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब, श्रीमंत, अन् आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार सर्व विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक पात्रता सिध्द करून कठीण परिश्रम घेवून एम. पी. एस. सी. परीक्षा पास झालेत. मात्र वेगवेगळ्या कारणांनी नोकरीच्या नियुक्त्या मिळत नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी आंदोलन, उपोषण, निवेदन देवून अन् यातील एक पात्र विद्यार्थी स्व. स्वप्नील लोणकर निराशेपोटी आत्महत्या केल्याने महाराष्ट्रभर खळबड उडाल्याने चालू अधिवेशनात जुलै अखेर रिक्त पदांवर नियुक्ती मिळणे बाबत अखेर घोषणा झाल्याने आनंद झाला.

या चांगल्या निर्णयामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शासनाचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील,यांचे सह विद्यार्थ्यांनी आभार मानून रखडलेल्या एम. पी. एस.सी. ची रखडलेली परीक्षा त्वरित घेण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button