Faijpur

करोना योध्द्यांचा सन्मान करून साजरा केला गणेश विसर्जनाचा कार्यक्रम

करोना योध्द्यांचा सन्मान करून साजरा केला गणेश विसर्जनाचा कार्यक्रम

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर तालुका तालुक्यातील पाडळसे गावातील सहयोगी क्लासेस चे श्री विजय कोळी व सौ सरला कोळी यांच्यातर्फे करोना सारख्या महाभयंकर आजाराच्या काळात, पाडळसे गावामध्ये ज्यांनी ज्यांनी करोना योद्धा म्हणून काम केले, त्यांचे आभार पत्र देऊन सत्कार, गणेश विसर्जन कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. ज्यामध्ये रेशनिंग दुकानदार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई वर्कर, आरोग्य सेविका, रिक्षा चालक, गावातील सामाजिक कामकरणारे युवक, फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस, गावचे पोलीस पाटील, गावातील ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तसेच सरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य. यांनी सेवाभावी वृत्तीने व लोक हित जोपासत केलेल्या करोना काळातील कामामुळेच यांचा सत्कार, सहयोगी परिवारातर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातून करण्यात आला. सर्व गावातून एक जनजागृती पर रॅली काढून, ठिक ठिकाणी वरील लोकांचा सत्कार करण्यात आला. आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. असा हा आगळावेगळा कार्यक्रम सर्व स्तरातील लोकांना खूप आवडला. त्याच बरोबर ज्यांचा सत्कार करण्यात आला, त्या सर्वांनी सहयोगी परिवाराचे खूप खूप आभार मानले. व असे विविध उपक्रम राबवण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तसेच गावातील तरुण मंडळींनी सहकार्य केले. *सूत्रसंचालन कुमारी स्नेहल दांडगे यांनी केले. व आयोजन श्री विजय कोळी सर व सौ सरला कोळी यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button