Baramati

सौभाग्य साडी डेपो’ च्या नीलम बांदल ठरल्या होम मिनिस्टर

‘सौभाग्य साडी डेपो’ च्या नीलम बांदल ठरल्या होम मिनिस्टर

उखाणे,म्हणी,कविता, च्या माध्यमातून मुलगी व पर्यावरण वाचवा चा संदेश

बारामती: वार्ताहर दत्ता पारेकर

मुलगी वाचवा,मुलगी शिकवा,स्त्रीभ्रूण हत्या करू नका,पर्यावरण वाचवा असा सामाजिक संदेश देत सौभाग्य होलसेल साडी डेपो आयोजित होम मिनिस्टर 2020 खेळ रंगला वाहिनीचा या कार्यक्रमाच्या विजेत्या बांदलवाडी च्या सौ नीलम बांदल ठरल्या.या वेळी सौभाग्य चे संचालक राहुल चव्हाण ,विवेक भोसले,अनिल कोकरे,संतोष बांदल व आप्पासाहेब भोसले,अशोकराव चव्हाण,गणपत कोकरे,सौ कोमल बांदल,कोमल भोसले,अस्मिता कोकरे,नीता चव्हाण,मुकेश घाडगे,केशव कांबळे आणि विशाल आगवणे ,रागिणी फौंडेशन च्या अध्यक्षा राजश्री आगम आदी मान्यवर उपस्तीत होते.मकर संक्रांत निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळान्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विजेत्या खालील प्रमाणे प्रथम नीलम बांदल,द्वितीय वैशाली जगताप,त्रितीय अमृता माने उतेजनार्थ मोनाली खामगळ,माया बनसोडे,वैशाली बांरुगळे.अनिल सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले तर बाळासाहेब बनसोडे यांनी मिमिक्री सादर केली.महिलांनी प्रश्न मंजुषा,उखाणे,म्हणी,कविता व विविध खेळा मध्ये सहभागी होत माता जिजाऊ , सावित्री,अहिल्या च्या कार्याचा गौरव केला.मुलींनी वैयक्तिक व समहू नृत्य करून ‘बेटी बचाव’ हा संदेश दिला. बारामती सह इंदापूर,दौंड,पुरंदर व फलटण तालुक्यातील महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button