Nashik

नाशिक जातपडताळणी कार्यालयात विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा,एजंटना मात्र डायरेक्ट एन्ट्री..

नाशिक जातपडताळणी कार्यालयात विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा,एजंटना मात्र डायरेक्ट एन्ट्री..

उदय वायकोळे नाशिक

नाशिक : नाशिक येथील जात पडताळणी कार्यालयात काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी दिसत आहे. सध्या इंजिनीअरिंग ,एम बी ए, अग्रीकल्चर विभागाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने विद्यार्थी वारंवार कार्यालयात चकरा मारताना दिसत आहेत. विद्यार्थी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सीसीटीव्ही सुरू असून तुम्हाला भेटता येणार नाही असे सुरक्षा रक्षक व शिपाई यांचेकडून सांगितले जाते.
अश्या परिस्थितीत जात पडताळणी कार्यालयात एजंटना मात्र मुक्तपणे प्रवेश दिला जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यावेळी मात्र सीसीटीव्हीत हे दिसत नसावे का ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असो मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विचार करून कोणाचेही नुकसान होऊ नये व प्रवेश मिळावा म्हणून जेथे पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे तेथे विहित मुदतीत सादर करता यावे हीच अपेक्षा विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button