Baramati

?Crime Dairy…सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी

? Crime Dairy….सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती- जीवाला जीव देणारे भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बारामती तालुक्यात घडली आहे.घराच्या वादातून धाकटया भावाने थोरल्या भावाचा पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना सुपे ता बारामती नजीक काळखैरवाडी येथे घडली आहे.

उपचारादरम्यान थोरला भाऊ मारुती वसंत भोंडवे वय 48 हे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.बुधवार दि12 रोजी रात्री 11:30 च्या सुमारास घटना घडली आहे.धाकटा भाऊ अनिल वसंत भोंडवे यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

राजबाग परिसरात हे दोघे राहतात,मयत मारुती पत्नी सविता मुलगा महेश व हर्षद पत्र्याच्या खोलीमध्ये असताना आरोपी अनिल म्हनाला की तू वेगळा रहा,आमच्यात राहू नकोस असे म्हणत घरच्या खिडकीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली व घराच्या दरवाज्याची बाहेरून कढी लावून जीवे मारण्याचा उद्देशाने, खिडकीतून मारुतीच्या अंगावर पेट्रोल टाकून काडीने पेटवून दिले.यावेळी पेटलेली अंगावरील कपडे विझवण्यासाठी पत्नी सविता आली असता तिलाही ठिकठिकाणी भाजले.आरडाओरडा करून इतरांच्या मदतीने दवाखान्यात नेले व गुरुवार दि 13 रोजी ससून रुग्णालयात जबाब नोंदविण्यात आला.आज शुक्रवारी मूर्त्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबतचा अधिक तपास सह्यायक पोलिस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button