Chalisgaon

ग्रामीण भागातील गावविकासासाठी तळमळीच्या कार्यकर्त्यांची गरज –खासदार उन्मेशदादा पाटील

ग्रामीण भागातील गावविकासासाठी तळमळीच्या कार्यकर्त्यांची गरज –खासदार उन्मेशदादा पाटील

चैतन्य तांडा येथे बांधकाम कामगारांना सेफ्टी किट वाटप : 42 प्रकारच्या लाभामुळे कामगार आंनदी

चाळीसगाव — तालुक्यातील करगाव ही ग्रामपंचायत मोठी असल्याने चारतांड्या मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत नव्हती.ही वस्तुस्थिती होती. आता तांड्यांचे विभाजन झाल्याने भरपूर विकास कामे होतील. दिनकर राठोड यांनी माझ्याशी सतत संपर्क साधून पाठपुरावा केल्यामुळे तांड्यांचे विभाजन झाले.गावविकासासाठी तळमळीचा कार्यकर्ता असला की गावाच्या आणि गावकऱ्यांच्या विकासात लोकप्रतिनिधी भरीव हातभार लागतो ही बाब खरी आहे. आज कामगार बांधवाना बेचाळीस प्रकारच्या लाभ असलेली योजनेचा शेवटच्या घटकाला लाभ मिळावा यासाठी दिनकर राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याने आज पर्यंत शेकडो लोकांना घरपोच लाभ मिळाला आहे.

ग्रामीण भागातील गावविकासासाठी तळमळीच्या कार्यकर्त्यांची गरज --खासदार उन्मेशदादा पाटील

यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे .चैतन्य तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना किटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विकासो चेअरमन दिनकर राठोड यांनी प्रास्तविकातून तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांनी ग्रामपंचायत विभाजन प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी मोठी मेहनत घेतली याबद्दल खासदार उन्मेश दादा यांचे आभार मानले.माजी प स सदस्य दिनेश बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता उन्मेश दादा यांनी सदैव प्रयत्न केले आहेत.त्यामुळे तालुक्यातील तांडावस्तीवर शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड ,उपसरपंच आनंदा राठोड यांचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी उपसरपंच आनंदा राठोड ,मधुकर राठोड, उदल राठोड,उदल पवार, वसंत राठोड, प्रवीण राठोड, साईनाथ राठोड, रणजित राठोड, संदीप पवार, भीमा राठोड, रघुनाथ राठोड तसेच करगाव, इच्छापूर व चैतन्य तांडा या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजवर सातशे कामगार बांधव बंधू भगिनी याना बांधकाम किट लाभ मिळाला आहे.अजूनही ज्यांना लाभ मिळाला नसेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button