Maharashtra

शासकीय योजनांची जत्रा राज्यात आदर्श ठरणार ना. गुलाबराव पाटील.. एकाच दिवशी ६५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष लाभ भरपावसात लाखभर नागरिक उपस्थित.

शासकीय योजनांची जत्रा राज्यात आदर्श ठरणार
ना. गुलाबराव पाटील..
एकाच दिवशी ६५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष लाभ
भरपावसात लाखभर नागरिक उपस्थित.

शासकीय योजनांची जत्रा राज्यात आदर्श ठरणार ना. गुलाबराव पाटील.. एकाच दिवशी ६५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष लाभ भरपावसात लाखभर नागरिक उपस्थित.

चाळीसगाव- प्रतिनिधी नितीन माळे
शासनाने अनेक लोकाभिमुख योजना जनतेच्या भल्यासाठी राबविल्या. मात्र या योजनांचा तळागाळापर्यंत लाभ पोहचतांना नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, योजना असूनही त्यासाठी वंचीत लाभार्थी असूनही त्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र खा. उन्मेष पाटील यांनी योजना देणारे शासन, लाभ घेणारी जनता या शासन, प्रशासन व जनतेचा संगम घडवून राज्याला आदर्श ठरेल अशी शासकीय योजनांची जत्रा गेल्या दोन वर्षापासून भरविली आहे. गेल्या जत्रेचे मी सर्व प्रथम मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर कौतुक केले होते. जो नेता शासनाच्या योजनांचा लाभ जनतेला पोहचविण्यासाठी तळमळ ठेवतो अशा राज्यातील मोजक्या लोकप्रतिनिधींमध्ये खा. उन्मेष पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जावून दोनशे तासात खासदार होणाऱ्या उन्मेष पाटील यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. आजची शासकीय जत्रा हीच खरी जनतेला आनंद देणारी जत्रा आहे, यामुळे ही शासकीय योजनांची जत्रा हि राज्यात आदर्श ठरली आहे.  असे गौरवोदगार सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज शासकीय योजनांची जत्र कृषी व सांस्कृतिक मोहोत्सवाचा उद्घाटन प्रसंगी काढले.

शासकीय योजनांची जत्रा राज्यात आदर्श ठरणार ना. गुलाबराव पाटील.. एकाच दिवशी ६५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष लाभ भरपावसात लाखभर नागरिक उपस्थित.
                खा. उन्मेष पाटील यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून आजपासून शहरातील नेताजी चौकाजवळ असलेल्या शहीद हेमंत जोशी क्रीडांगणात तीन दिवसांची शासकीय योजनांची जत्रा व कृषी तसेच सांस्कृतीक महोत्सवाचे उदघाटन आज सकाळी 11 वाजता सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष नामदार पाशा पटेल होते. महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले. या प्रसंगी खा. उन्मेष पाटील, ज्येष्ठ नेते कैलास सूर्यवंशी, भाजप प्रदेश सदस्य यु डी माळी, जिल्हा परिषदेचे सभापती पोपटतात्या भोळे,  नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पं.स. सभापती स्मितल बोरसे, उमंग समाज महिला परिवाराच्या संस्थापीका अध्यक्षा संपदा पाटील, उपसभापती संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, ज्येष्ठ नेते वसंतराव चंद्रात्रे,  शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी सदस्य दिनेश बोरसे, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, माजी जीप सदस्य धर्मा वाघ, किशोर पाटील ढोमणेकर, आर पी आय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, माजी जीप सदस्य सुभाष चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे, विशाल सोनवणे,कृषी अधिकारी एस पी साठे, वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, सहाय्यक निरीक्षक आशिष रोही, वाहतूक शाखेचे सुरेश शिरसाठ, गट नेते संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील ,नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार, नगरसेवक चिराग शेख, नगरसेवक चंदू तायडे, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, कपिल पाटील, सचिन पवार, संकीत छाजेड,   बबडी शेख, बाळासाहेब राऊत,शुभम पाटील, योगेश गव्हाणे, शिवराज पाटील, ज्ञानेश्वर साबळे, विशाल करडा, हिमांशू बराटे, सुनिल रणदिवे, राहुल पाटील, सोनू अहिरे,संतोष देशमुख, चेतन देशमुख, कल्पेश पाटील, शिवाजी मराठे, अनिल गोत्रे, मनोज पाटील, बंडू पगार, अनिल चव्हाण,भोजराज खैरे, अजय करनकाळ, शेख सर अर्जुन पाटील, सुहास पवार, दिनकर राठोड, गोरख राठोड,गणेश काळे ,समाधान राठोड, अनिस मणियार, दिपक एरंडे, भरत गोरे, कैलास गावडे, अमित सुराणा, अमोल मेठे यांच्यासह भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा विविध पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अतिशय आवेषपूर्ण भाषणात उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, आज निसर्ग बिघडला असल्याने आपण वठणीवर येण्याची गरज आहे.वेळेवर पाऊस हवा असेल तर आपल्याला वृक्ष लागवडीकडे वळावे लागणार आहे. माझ्या नातूला पाणी मिळेल की नाही, श्वास मिळेल की नाही याची चिंता मला आहे. आपण निसर्ग संपवायला निघालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवत बांबू शेतीला प्रोत्साहन दिले. बांबु ऑ्निसजन देण्याच्या कामाबरोबरच खनिज तेल देत असल्याने त्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे.मी स्वत:35 एकरावर बांबुची लागवड केली आहे. राज्यशासनाने 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवलेले होते मात्र, ते वाढवून आता 100 कोटी वृक्ष कोटीचे लागवडीचे करावे लागेल असे ते म्हणाले. खा. उन्मेष पाटील यांना सोबत घेवून पंधरा दिवस केंद्रात विविध मत्र्यांना भेटलो. खा. उन्मेष पाटील हे अतिशय नशिबवान असून पाच वर्षात त्यांना दोनदा संधी मिळाली आमदारकी होता होता खासदारकी मिळालेला हा भाग्यवान माणूस जनतेच्या प्रती असलेल्या या जिव्हाळ्यामुळे कौतुकास पात्र आहे. साहेब साहेब म्हणणारे अनेक भेटतात मात्र, मामा, म्हणणारा खा. उन्मेष पाटील यांनी माझ्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. गोर गरीब जनतेला एका छताखाली आणून त्यांनी राज्यात इतिहास घडविलेला आहे. पाणी टंचाईमुळे जुम्मे के जुम्मे नहाणारे महिनो के महिनो नाहिऐंगे असे हिंदीत त्यांनी सांगितले. यावेळी सभामंडपात प्रचंड हस्यकल्लोळ झाला. उद्देशुन त्यांनी या बाबीची दखल घ्यावी असे आवाहन केले. यावेळी खा. उन्मेष पाटील यांनी प्रास्ताविकातुन शासकीय योजनेच्या जत्रेविषयी माहिती देतांना सांगितले की शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम मागील वर्षी राबवुन तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवुन दिला होती ती जत्रा यशस्वी झाल्याने पुन्हा जत्रेचे आयोजन केले आहे शासनाच्या योजना विवीध दाखल्यांसाठी वृद्ध, शेतकरी व जनतेला फिरावे लागत होते. यासाठी शासन, प्रशासन व जनतेला एकाच ठिकाणी एका छताखाली मिळावे  सर्वांना योजनांचा लाभ व्हावा दाखले देण्याचा प्रमाणीक प्रयत्न केला असल्याचे सांगत या योजनाद्वारे १५ हजार विधवा, परीतक्त्यांना पगार चालु केले, २२ हजार नागरीकांना रेशनकार्ड दिले, ४५०० आदीवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप केले, ४२ हजार ४५० कुटुंबांना आयुष्यमान योजनेत समाविष्ट केले शिवाय एस टी चे ३५०० स्मार्ट कार्ड लाभार्थ्यांना घरपोच देणार असुन १२३५ लाभार्थ्यांना घरकुल धनादेश, विहीर पुनर्भरण ७५० शेतक-यांना वर्क ऑर्डर, आदी योजनांचा लाभ या तिन दिवसात सुमारे दोन लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळणार आहे यासाठी  १२० स्टॉलवर शेकडो कर्मचारी अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी यांनी तळागळातील सर्वच लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. उपस्थित माता भगिनींनो आपला फक्त वेळ द्या शासनाचे पैसे मी भरतो असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटक नामदार गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की अशा प्रकारच्या योजना राबवतांना ५ ते ६ महीने आगोदर शासकीय अधिकारी, कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीने अशा जत्रा यशस्वी होतात. या जत्रेत अनेक योजनांचा लाभ तालुक्यातील जनतेला होणार आहे. शिवाय शासनाच्या माध्यमातुन १००० रुपये  पेन्शन मिळणार आहे ती जास्त नसली तरी आजच्या युगात आई वडीलांना कोणी सांभाळेल याची शाश्वती नाही त्या  वृद्ध माता पित्यांना  हजार रुपये कामात पडणार आहे. असे सांगुन २०० तासात खासदार होणारा उन्मेश पाटील नशीबवान आहे आमदारकीचा कार्यकाळ संपत नाही तर लगेच खासदार झाले आजच्या युगात सरपंच होतांना देखील कसरत करावी लागते. या जत्रेत मनोरंजन कार्यक्रम व नाटक ठेवले आहे मी देखील अशा नाटकांमध्ये काम केले व ते सोडुन राजकारणाच्या नाटकात आल्याचे सांगताच एकच हशा पिकला शिवाय एकाच छताखाली विवीध योजनांची जत्रा भरवणा-या खासदार उन्मेश पाटलांचे करीत सांगितले की उन्मेष दादा तुमचं  इलेक्शन झालं आता आमच्या वेळ आहे. मागच्या सारखं करू नका . युती कायम ठेवा .अब हमारी बारी है. असे भावना त्यांनी व्यक्त केली..
प्रमुख अतिथी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष ना. पाशा पटेल यांनी शासकीय योजनांची जत्रेचे आयोजन करणा-या खासदार उन्मेश पाटलांचे कौतुक केले ते म्हणाले की ही जत्रा बघुन माझे उर भरुन आले आहे ४० वर्षात जे कोणी केले नाही ते खासदार उन्मेश पाटील यांनी ५ वर्षात करुन दाखवले पाच वर्षात आमदार ते खासदार व पुढे काय होणार हे सांगता येत नाही असे सांगुन उन्मेश पाटील हे भविष्यात केंद्रात मंत्री होतील अशा प्रकारचे भाकीतच त्यांनी उन्मेष दादा यांचे नाव न  घेता केले.त्यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. यापुर्वी दाखले अथवा शासकीय योजनांसाठी अधिका-यांच्या मागे फिरावे लागत होते मात्र या जत्रेत अधिकारीच आता लाभार्थ्यांना योजनेचा लाभ जागेवर देत आहेत. सध्या पावसाचा लपंडाव सुरु आहे पुर्वी नक्षत्रावर पाउस पडायचा म्हणुन शेतकरी सुखी होता आता कुठे दुष्काळ तर कुठे महापुर, ढगफुटी अशी परिस्थीती आहे पाण्यासाठी ३३ टक्के जंगल लागते आता एक टक्काच जंगल आहे म्हणुन पाउस पडत नाही. झाडे लावली तरच पाणी पडेल अन्यथा १० वर्षानंतर आपल्याला ऑक्सीजनची हंडी घेवुन फिरावे लागणार आहे भारत ८ लाख कोटीचे डिझेल पेट्रोल बाहेरील देशातुन येत होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व पर्यटन मंत्री नितीन गडकरी यांनी बांबुपासुन पेट्रोल बनवता येते याचा शोध लावुन घेतला म्हणुन हा पैसा आता भारतातच राहणार आहे म्हणुन आता बांबुची लागवड करावी असे आवाहन करत बांबुचे झाड कार्बन खाते व मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन देते असे सांगुन आपल्याला जगायचे असेल तर  झाडे लावा असे आवाहन ना पाशा पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल नानकर, सुभाष उगले यंनी तर आभार उपसभापती संजय पाटील ,माजी प स सदस्य दिनेश बोरसे यांनी मानले यावेळी कृषी विभागाचा लकी ड्रो काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button