Amalner

?️अमळनेर कट्टा.. ग्राहक कल्याण फाऊंडेशन अमळनेर शहर अध्यक्ष पदी प्राचार्य प्रा. रविंद्र माळी….

?️ अमळनेर कट्टा.. ग्राहक कल्याण फाऊंडेशन अमळनेर शहर अध्यक्ष पदी प्राचार्य प्रा. रविंद्र माळी….

अमळनेर : जानेवारी रोजी ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या अमळनेर येथील जिल्हा कार्यालयात
महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि
जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे अमळनेर तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी खान्देश शिक्षण मंडळांच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रविंद्र गंगाराम माळी यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली .
बैठकीत महिला आघाडी प्रमुख सौ.मेघा भांडारकर,सेवानिवृत्त तहसीलदार आर.जे.चव्हाण,Adv.आर.व्ही. निकम ,माजी न्यायाधीश गुलाबराव पाटील, Adv.कुंदन साळुंके, Adv.प्रदीप भट ,विक्रांत पाटील , प्रा.डॉ.सुभाष खुनेपींपरे,पत्रकार जयंतीलाल वानखेडे ,आबिद शेख , प्रा. सुभाष महाजन, संजय महाजन सर, योगेश महाजन इ . उपस्थीत होते.
प्राचार्य प्रा..रविंद्र माळी यांच्या स्तुत्य निवडी बद्दल ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर,कार्यवाह सतिश साकोरे यांच्यासह राज्य कार्यकारिणी ,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी,जिल्हाभरातील कार्यकर्ते, महाविद्यालयीन सहकारी, सर्व समाज बांधव आणि मित्र परिवार
यानी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button