Erandol

एरंडोल येथील माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला ऑनलाइन शिक्षकदिन साजरा…

एरंडोल येथील माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला ऑनलाइन शिक्षकदिन

रजनीकांत पाटील

रामनाथ हिरालाल जाजू प्राथमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून गतकाळातील आठवणींना उजाळा देत व बालवयात त्यांना घडविणार्या गुरूजनांविषयी कृतद्न्यता व्यक्त करीत ऑनलाइन शिक्षकदिन साजरा केला,
जवळपास ३० ते ३५ वर्षांपुर्वी रामनाथ हिरालाल जाजू या प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांना शिकवणार्या,घडवणार्या व सदैव स्मरणात असणार्या शिक्षकांप्रती ऑनलाइन माध्यमातून एकञ येत व आपल्या गुरूजनांविषयी सदीच्छा व्यक्त करीत,त्यांच्या सुदृढ आरोग्याच्या ईच्छा व्यक्त करीत शिक्षकदिनाचा कार्यक्रम घडवुन आणला.

१९८७ ते १९९१साली शहरातील रा. हि. जाजू प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या निरंजन मोरे,विनिता जोशी,योगीता सोनार,आशिष जैन,ह्रषीेकेश ठाकुर,हितेश पवार,मयुर पाटील,देवल बेहेडे,पुनम सैंदाणे,रूपाली पाटील,कविता पाटील,स्मिता पाटील,दिप्ती देशमुख,कैलास महाजन व निलेश भावसार या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाची माहिती दिली,आपले गुरूजन श्री.एच.एम.चौधरी सर व श्री.एम.झेड परदेशी सर या शिक्षकांनी आपणास दिलेल्या द्न्यानरूपी शिदोरीस स्मरून त्यांची या शिक्षकदिनी ऑनलाइन माध्यमातून भेट घेतली व या शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला ,याप्रसंगी या सर्व विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या गुरूजनांच्या एकमेकांप्रती भावना अनावर झाल्या होत्या.

या ऑनलाइन कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी विदयार्थ्यांनी दोन्ही गुरूजनांच्या प्रत्यक्ष भेटीची ईच्छा व्यक्त केली असता यावेळी दिवाळी सणावेळी सर्व विद्यार्थी एरंडोल येथे एकञ येत असल्याने कोरोनाच्या तत्कालिन नियमांआधारे गुरूजनांकडून भेटीचे आश्वासन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button