Mumbai

राज्यात पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार -राज्यमंत्री बच्चू कडू

राज्यात पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार -राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई पी व्ही आंनद

राज्यात पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च थोड्या प्रमाणात कमी होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल.असे मत ना बच्चू कडू यांनी व्यक्त केले असू असा प्रस्तावही आपण मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचे त्यांनी महटले आहे.

‘रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रातून संपूर्ण देशभरात पोचली आहे. या योजनेत थोडा बदल करून आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार, कोरडवाहू शेतकरी आणि त्यानंतर सिंचन सुविधा असणारे शेतकरी अशा प्राधान्यक्रमाने मजुरीचा खर्च देण्यात आला तर शेतकऱ्यांच्या जीवनमानावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.असे मत ना बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे जर ही योजना राबवली तर आजन्म शेतकऱ्यांच्या लक्षात राहतील असेही ते म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button