Bollywood

Bollywood: सलमान खानला गंभीर दुखापत.. टायगर अभी जखमी है…!

Bollywood: सलमान खानला गंभीर दुखापत.. टायगर अभी जखमी है…!

मुंबई अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘किसी का भाई किसीकी जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट खूप लोकप्रिय देखील झाला. या चित्रपटाच्या यशयानानंतर अभिनेता सलमान त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.
अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘किसी का भाई किसीकी जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट खूप लोकप्रिय देखील झाला. या चित्रपटाच्या यशयानानंतर अभिनेता सलमान त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यन अभिनेता सलमान खान सोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून, डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.

स्वतः सलमान खान ने याबाबद माहिती दिली आहे. सलमान खान ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर मार लागला असून त्याने उपचार घेतल्यानंतर खांद्याला पट्टी लावलेली दिसत आहे.

अभिनेता सलमान खानने हि पोस्ट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्याने यात दुखापतीचा आपला फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहले कि, संपूर्ण जगाचं ओझं तुमच्यावर आहे, असं तुम्हाला वाटतं. परंतु जगाचं जाऊ द्या, पाच किलोचा डम्बेल उचलून दाखवा,असं म्हणत सलमानने टायगर जखमी है, असं कॅप्शन दिलं आहे.

सध्या सलमान खानची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंग दरम्यान त्याच्या डाव्या हाताला हि दुखापत झाल्याचे कळते. परंतु हि दुखापत कितपत गंबीर आहे हे समजू शकलेले नाही.

परंतु त्याच्या या पोस्टने त्याचे सर्व चाहते चिंतेत पडलेले पाहायला मिळत आहे. अनेक जण त्याला अराम करण्याचा देखील सल्ला देताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टने त्याच्या सर्व चाहत्यांचा जीव भांड्यात आपल्याचे पाहायला मिळत आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button