Amalner

Amalner: जवखेड्याच्या तरुणाची तापी नदीत उडी मारून आत्महत्या..!

Amalner: जवखेड्याच्या तरुणाची तापी नदीत उडी मारून आत्महत्या..!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावलदे येथे तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. या युवकाचा मृतदेह १० एप्रिलला दुपारी हाती लागला. मृताची ओळख पटली असून तो पंकज शिवदास पाटील (वय ४५, रा. जवखेडा ता. अमळनेर) असल्याचे निष्पन्न झाले. शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे दोन दिवसांपूर्वी तापी नदीच्या पुलावर दुचाकी उभी असल्याचे आढळून आले होते. गाडीजवळ शर्ट, चपला व आधार कार्ड आढळले होते. आधार कार्डवर पंकज शिवदास पाटील असे नाव होते.

घटनास्थळावरील परिस्थितीवरुन नदीपात्रात संबंधिताने उडी टाकल्याचा संशय व्यक्त करून शोधास सुरुवात झाली. नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनी १० एप्रिलला दुपारी हाती लागला. तपासणीत मृत पंकज शिवदास पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा चुलत शालक तथा खर्दे पाथर्डे येथील रहिवासी भिकन पाटील यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे
कारण समजू शकले नाही. पंकज च्या मागे पत्नी दोन मुले,आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button