India

Important: पार्ले जी बिस्कीट खाता ना..? कसं पडलं पार्ले G हे नाव..?

Important: पार्ले जी बिस्कीट खाता ना..? कसं पडलं पार्ले G हे नाव..?

पार्ले जी हे देशातील सर्वाधिक खप असणारे बिस्किट आहे. लहान मुलांसह पौढांचेही हे आवडते बिस्किट आहे. 90च्या दशकातील मुलांच्या तर पार्ले-जीसोबत अनेक आठवणी असतील. चहा आणि सोबतली पार्ले-जी हे कॉब्मिनेशन सगळ्यांचे फेव्हरेट होते. पार्ले-जीची जाहिरात आणि बिस्किटाच्या कव्हरवर छापण्यात आलेली छोटी मुलगी यांबाबत आज अनेक दंतकथा ऐकवण्यात येतात. पार्ले बिस्किटांवर असलेली ती छोटी मुलगी म्हणजे प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांचा लहानपणीचा फोटो असल्याच्या अफवाही मध्यंतरी रंगल्या होत्या. तसंच, पार्ले जी मधील G चा नेमका अर्थ काय? आज आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

पार्ले जी नाव कुठून आले?

पार्ले जीमधील G म्हणजे जिनीअस असंच सर्व लोकांच्या तोंडी असायचे. पण तुम्हाला माहितीये का हा त्याचा खरा अर्थ नाहीये. सुरुवातीला या बिस्किटाचे नाव ग्लुको बिस्किट होते. दुसऱ्या महायुद्धात भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांचे ते आवडते बिस्किट होते. पण स्वातंत्र्यानंतर या बिस्किटांचे उत्पादन अचानक थांबवण्यात आले. कारण हे बिस्किट तयार करण्यासाठी गव्हाचा वापर करण्यात यायचा आणि त्याचवेळी देशात अन्नाचे संकट निर्माण झाले होते.

कंपनीने पुन्हा या बिस्किटाचे उत्पादन सुरु केल्यानंतर अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या सुरू झाल्या होत्या. विशेषतः ब्रिटानियाची ग्लुकोज डी या कंपनीने बाजारपेठ काबीज केली होती. तेव्हाच ग्लुको बिस्किट नव्याने लाँच करण्यात आले. यावेळी बिस्किटाचे नाव पार्ले जी ठेवण्यात आले आणि पार्लेच्या पॅकेटवर एखा लहान मुलींचा फोटो छापण्यात आला. आता हेच नाव आणि मुलीचा फोटो ही पार्ले बिस्किटांची ओळख बनली.

मुंबईतील विलेपार्ले येथे कंपनीचा कारखाना होता म्हणून बिस्किटांच्या नावात पार्ले हा शब्द घेण्यात आला. तर त्यातील जी या शब्दाचा अर्थ जिनीअस नव्हे तर ग्लुकोज असा आहे.

आता बिस्किटांच्या पॅकेटवर दिसणारी लहान मुलगी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर अनेक नावेदेखील चर्चेत आली. यात सुधा मूर्ती यांचे नावही आघाडीवर होते. तर, नागपूरच्या नीरु देशपांडे यांचेही नाव पुढे येत होते. मात्र कंपनीने या सर्व अफवा फेटाळल्या आहेत. पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपचे मॅनेजर मयंक शाह यांनी हे दावे फेटाळले आहेत. पार्ले जीच्या पॅकेटवर दिसणारे मुल हे एक इल्युस्ट्रेशन (काल्पनिक) असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळेचे लोकप्रिय कलाकार मगनलाल दइया यांनी हे चित्र रेखाटलेले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button