Amalner

अमळनेर महसूल राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

अमळनेर महसूल विभागा तर्फे राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

अमळनेर : भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्यानं गौरव केला जातो. त्या लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.

अमळनेर महसूल राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अमळनेर महसूल विभागा मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहरातील विविध मान्यवरांसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे उपस्थिती दिली. निवडणूक आयोगामार्फत हा कार्यक्रम 25 जानेवारी हा दिवस भारत भरात मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो व अनेक मतदारांना आपले मतदानाचे हक्क व मतदान कशा पद्धतीने करावे याची संपूर्ण माहिती नव मतदारांना देण्यात येते.

अमळनेर महसूल राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

अमळनेरसह तालुका या दिनी विद्यार्थ्यांसह अनेक नव मतदारांनी हजेरी लावली. या वेळी महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विधानसभा मतदार संघातील उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, नगर परिषद उपमुख्यअधिकारी संदीप गायकवाड, नगर परिषद प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नायब तहसिलदार PD धनगर, SD देशमुख, पत्रकार प्रा जयश्री साळुंखे,प्रहार अपंग युनिट चे योगेश पवार यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

अमळनेर महसूल राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

अध्यक्षीय भाषणात सीमा अहिरे म्हणाल्या की, परिसरात दरम्यानच्या काळात 2 निवडणूका पार पडल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये नागरिकांनी blo यांना उत्कृष्ट सहकार्य केले. वर्षभरात मतदार यादीचे शुद्धीकरण केले जाते. त्यात महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी BLO यांनी चांगले कार्य केले. या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी आभार मानले आहेत. सूत्रसंचालन डी. ए. धनगर , आभार एस. पी वाघ यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button