Amalner

Amalner: प्र डांगरी गावठी दारू विक्रेत्यावर छापा…

Amalner: प्र डांगरी गावठी दारू विक्रेत्यावर छापा…

अमळनेर तालुक्यातील प्र. डांगरी येथे छापा टाकून मारवड पोलिसांनी गावठी दारू विकणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडे २४०० रू. किमतीची साठ लिटर दारू आढळून आली.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, प्र. डांगरी येथे गावठी दारू विक्री सुरू
असल्याची माहिती पीएसआय विनोद पाटील यांना मिळाल्याने त्यांनी हेकॉ सचिन निकम व पोना सुनील तेली यांना सोबत घेत डांगरी येथे छापा टाकला असता रमेश बंडू वडर हा दोन ड्रम व प्लास्टिक पिशव्या घेवून गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने आढळून आला. त्याच्याकडून २४०० रू. किमतीची साठ लिटर दारू आढळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मुं. प्रो. अॅक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button