Motha Waghoda

मोठा वाघोदा येथे हिंगोणाजवळील अपघातातील मयतांना वाघोदा येथे श्रद्धांजली

मोठा वाघोदा येथे हिंगोणाजवळील अपघातातील मयतांना वाघोदा येथे श्रद्धांजली

प्रतिनिधी/- मुबारक तडवी मोठा वाघोदा ता.रावेर

येथील प्रकाश विद्यालयाच्या पटांगणात निंबोल (ता.रावेर) व चिंचोल,चांगदेव (ता.मुक्ताईनगर) येथील अपघाती निधन झालेल्या १२ जणांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डि.के.महाजन,उपाध्यक्ष जगदीश पाटील,संचालक विजय पाटील विद्यालयाचे माजी प्राचार्य आर.जी. पाटील यांनी शोक संदेश व्यक्त केला. या दुखत घटनेने मयतांच्या परिवारावरील आलेले संकट व अपघाताची माहिती देत असतांना वाहतुकीतील बेशिस्तपणा, स्वागत समारंभातील वेळेची मर्यादा,आधुनिकतेच्या नावाखाली होत असलेल्या लग्न समारंभातील काही गोष्टी या विषयांना साद घालण्यात आली.प्रास्ताविक विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक जी.आर.महाजन सर यांनी केले यावेळी चक्रधर जेष्ठ नागरिक मंडळाचे भागवत पाटील, राजाराम पाटील,श्रावण महाजन तसेच संस्थेचे सचिव किशोर पाटील विद्यालयातील शिक्षक व गावातील तरूण व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button