Chimur

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात परीसर स्वच्छता ,जलशक्ती शाश्र्वत विकास विषयावर कार्यशाळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात परीसर स्वच्छता ,जलशक्ती शाश्र्वत विकास विषयावर कार्यशाळा

चिमूर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाके

गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाकडून परिसर स्वच्छता, जलशक्ती व शाश्वत विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, नागपुर विभागाचे प्रकल्प अधिकारी सौरभ शंभरकर मार्गदर्शनात म्हणाले की, प्रत्येकांनी परिसराची स्वच्छता केली पाहिजे. तसेच जलव्यवस्था व उर्जा स्त्रोत वाढविण्यासाठी प्रत्येकांनी वाटा उचलायला पाहिजे. ग्रामीण भागात नैसर्गिक संसाधने भरपूर असतात. शाश्वत विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.

यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. कार्तिक पाटील म्हणाले की, एका विद्यार्थाने एक झाड लावणे आवश्यक आहे. असा संकल्प करावा. पर्यावरण संवर्धना साठी महाविद्यालयातील विविध उपक्रमाबाबत अवगत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड मार्गदर्शनात सांगितले की, वैयक्तिक स्वच्छतेसोबत सार्वजनिक स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ कसा राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. हरेश गजभिये, रासेयो विभाग समन्वयक प्रा. पितांबर पिसे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उदय मेंडूलकर, प्रा. रुपाली बरडे, प्रा. वर्षा सोनटक्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशुतोष पोपटे, प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे यांनी केले. उपस्थितांचे आभार रासेयो सहकार्यक्रमाधिकारी डॉ. नितीन कत्रोजवार यांनी मानले. कार्यक्रमाला गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायकराव कापसे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button