Akkalkot

जागतिक महिला दिनानिमित्त अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार कार्यक्रम उत्साहात साजरा

जागतिक महिला दिनानिमित्त अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार कार्यक्रम उत्साहात साजरा

तालुक्यातील अवैध दारू बंद करुन महिलांना न्याय देऊ — आमदार सचिन कल्याणशेट्टी

कृष्णा यादव अक्कलकोट प्रतिनिधी :-

अक्कलकोट शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तरुणवर्ग दारूच्या आहारी जाऊन त्यांच जीवन उद्ध्वस्त होत आहे. याच दारूमुळे बहुसंख्य महिलांचे कुटूंब ही उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत.म्हणून आज मी महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील माता भगिनींना व महिलांना सांगू इच्छितो की, तालुक्यातील संपूर्ण अवैध दारू बंद करुन महिला वर्गांना न्याय देऊन आदर्श तालुका घडवू ,असे मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

अक्कलकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,वैद्यकीय, विधीसेवा, पोलीस प्रशासन,महिला उद्योजक,क्रीडापट्टू(कुस्तीपटू) व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार देऊन सर्जेराव सभागृह अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बोलत होते.या वेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी ज्योती पाटील,स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले पाटील, जिल्हा परिषद बाल व महिला कल्याण सभापती स्वाती शटगार,अश्विनीताई निंबाळकर,फतेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,सीओ आशाताई राऊत, अँँड.हेमा चिंचोळकर, पं.स.सभापती सुनंदा गायकवाड,माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील बोलताना म्हणाले की, आज ही समाजात स्री -पुरुष समानता दिसून येत नाही.समाजात आज ही जन्माला येणाऱ्या मुली पेक्षा मुलाचाच स्वागत अधिक होताना दिसते.या साठी सामाजिक मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्याधिकारी आशा राऊत म्हणाले की, नुसते आठ मार्च रोजी नाही तर वर्षभर महिलांचे सन्मान व प्रतिष्ठा जपली पाहिजे.अनेक समाजसुधारकांनी स्त्री उन्नतीचा पाया रचला आहे.स्वतंत्र भारतात स्त्रियांच्या उन्नतीसाठी विविध योजना आहेत पण स्त्री व पुरूष हे समान चालले पाहिजे.जबाबदारी स्त्री यशस्वी पणे पेलताना दिसतात पण हक्काबाबतही जागृती निर्माण झाली पाहिजे असल्याचे सांगितले.
चौकट:-
कोण काय म्हणाले:-
१) पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले – पुरूषांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.तसेच कायद्यातीला महिल्यांच्या कल्याणाच्या तरतुदी सांगितल्या.
२) फत्तेसिंह संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर- दुर्लक्षित महिलांना मदितीचा हात देणे गरजेचे आहे.३) वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे – ग्रामीण पत्रकार विविध मोजकेच कार्यक्रम साजरे करते.पण सामाजिक बांधिलकी जपत कर्तत्ववान महिल्यांच्या कार्याचे कौतुक जागतिक महिला दिनानिमित्त केलेले कौतुकास्पद आहे. या वेळी बाबासाहेब निंबाळकर, महेश इंगळे, स्वाती शटगार, सोनाली गोडबोले पाटील आदींनी ही स्त्री-सन्मान विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या क्रांतीज्योती आदर्श महिलांचा झाला सन्मान
आदर्श महिला उन्नती कार्य– अलकाताई भोसले, आदर्श महिला संघटक–मल्लमा पसारे, आदर्श शैक्षणिक कार्य–राजश्री कल्याण,आदर्श शैक्षणिक कार्य- सोनल जाजू, आदर्श विधी सेवा –अँँड मंगला जोशी, आदर्श वैद्यकीय सेवा –डाॅ दिपमाला अडवितोटे, आदर्श पोलीस काॅन्स्टेबल–शारदा हिप्परगी, आदर्श महिला उद्योजक –उषा छत्रे , आदर्श महिला क्रीडा पट्टू ( कुस्ती )–अंकिता जाधव,आदर्श समाजसेविका –सोनाली यादव

या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल राठोड, अध्यक्ष अनिल इंगळे, उपाध्यक्ष रियाज सय्यद, सचिव सुभाष बिराजदार, प्रसिद्धी प्रमुख विजय विजापूरे, गंगाधर नागशेट्टी, सुरेश माने, यशवंत पाटील,राजशेखर विजापूरे, विश्वनाथ राठोड,सिध्दाराम कोळी, माणिकचंद धनशेट्टी, शंभूलिंग अकतनाळ, प्रशांत जाधव, उषा हंचाटे,योगेश कबाडे, वीरपाक्ष कुंभार,बसवराज बिराजदार आदी पत्रकार बांधव व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रविकांत धनशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन महादेव जंबगी यांनी केले.तर आभार शंकर व्हनमाने यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button