Chimur

Chimur: आठवले समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

Chimur: आठवले समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

चिमूर / प्रतिनिधी-

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. सुरेश मिलमिले, ग्रंथमित्र सुभाष शेषकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विना काकडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. शुभांगी लुंगे मार्गदर्शनात म्हणाल्या की, राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यानी भविष्याची वाटचाल केल्यास राष्ट्र उभारणीत योगदान दिल्याचे समाधान होणार आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेले संस्कार हे आदर्श मातेचे उत्तम उदाहरण ठरू शकते. माँ जिजाऊ यांच्या कार्याचा सखोल अभ्यास केल्यास त्यातुन राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, न्याय व समता असे अनेक समतावादी पैलु उकल होवु शकते. असे विविध उदाहरणे देवुन मार्गदर्शन केले. डॉ. सुरेश मिलमिले यांनी याप्रसंगी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगुन विध्यार्थ्यांना संबोधीत केले. ग्रंथमित्र सुभाष शेषकर यांनी आपण थोर पुरुषांच्या जयंत्या का साज-या करतो याविषयी मार्गदर्शन करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श घ्यावा आणि आपला एक उद्देश ठरवून त्या उद्देशाप्रती सतत कार्य करत रहावे तसेच सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान ठेवावे असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार डॉ. विना काकडे यांनी मानले. कार्यक्रमाला

महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button