Amalner

?️ अमळनेर येथे जिल्हाधिकारी यांची रुटीन आढावा बैठक संपन्न

?️ अमळनेर येथे जिल्हाधिकारी यांची रुटीन आढावा बैठक संपन्न

अमळनेर येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.जळगांव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तालुक्यात होत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज उपविभागीय कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत साळी वाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह अमळनेर शहरात आणल्या नंतर ह्या रोगाचा प्रसार झाला ती मोठी चूक झालेली आहे.
लोक प्रतिनिधी ,प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.जो समन्वय आता पर्यंत आढळुन आला नाही. त्यामुळे जनता कोणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सुरुवातीला खाजगी डॉ आणि वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली.या बैठकीत ग्रामीण रूग्णालयात कोव्हिडं केअर सेंटर सुरू करण्यात येईल.ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येतील.शहरातील खाजगी डॉ ची मदत घेतली जाईल.इ मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कालच दिलेल्या पोलीस क्वार्टर येथील लाईट पाणी या संदर्भातील पत्रा नुसार म जिल्हाधिकारी स्वतः पोलीस क्वार्टर ढेकू रोड येथे भेट देण्यासाठी गेले असून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. शिवाय सदर इमारतीचा उपयोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन वेळी केला जाऊ शकतो म्हणून देखील ही इमारत सर्व सोयींनी परिपुर्ण असावी हा देखील उद्देश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button