Jalgaon

ग्रामीण विद्यार्थ्यांची होरपळ थांबवा

ग्रामीण विद्यार्थ्यांची होरपळ थांबवा

रजनीकांत पाटील जळगांव

जळगाव : जळगांव जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी देखील ग्रामीण विद्यार्थ्यांना नियमित बस सेवा नसल्यामुळे त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, विद्यार्थी चे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून साने गुरुजी विद्यालय अमळनेर चे शिक्षक डी ए धनगर यांनी बस आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री आर एस पाटील यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचा त्रास दूर व्हावा, नियमित बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली.
नववी ते बारावी चे वर्ग नियमित सुरू झालेत. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहराकडे येतात. शहरात येऊन विविध शाळांमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी काही विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत येण्यास उत्सुक आहेत आणि बस सेवा बंद आहेत. परंतु शाळा चालू झाल्यामुळे या काही विद्यार्थ्यांना शहराकडे यावे लागत आहे नियमित शाळेत आले नाही तर शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी असंख्य विद्यार्थी बस सेवेची मागणी करत आहेत. तरी लवकर नियमित बस सेवा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी डी ए धनगर यांनी केली आहे तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांची सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याकरिता आपण बस आगारात जाऊन आगार व्यवस्थापक यांच्याशी योग्य तो विचारविनिमय करून तोडगा काढू असे सूचित केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button