India

Emergency Alert: आणि स्मार्ट फोनचा आवाज झाला असह्य… एकाच वेळी अनेक फोन एकाच ठिकाणी ट्युं…ट्युं वाजू लागले….

Emergency Alert: आणि स्मार्ट फोनचा आवाज झाला असह्य… एकाच वेळी अनेक फोन एकाच ठिकाणी ट्युं…ट्युं वाजू लागले….

आज सकाळी देशभरातील सर्वच लोकांच्या मोबाईल अँड्राईड फोन्सवर एक इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert Message) आला. सुरुवातीस तो इंग्रजीत आला आणि नंतर तो मराठीत देखील आला. सकाळी साधारण 10 ते 10.30 च्या दरम्यान अनेक लोकांच्या फोन अचानक अलार्मसारख्या मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा मॅसेज म्हणजे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात आले. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला. दरम्यान, आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.
या अलर्ट मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे की, हा संदेश म्हणजे खरेतर भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. याचाच अर्थ हा केंद्र सरकारकडून एक चाचणी करण्यात येत आहे. मात्र या मेसेजचा नेमका अर्थ काय हे लोकांना कळाले नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात घाबरले.

पावसामुळे सध्या सर्वच ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढलेले आहे. अशातच अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या , रेल्वे सेवा ठप्प झाली त्यामुळे लोक अडकून राहीली. अशा संकटाच्या वेळी लोकांना येणाऱ्या आपत्तीची माहीती आधीच कळावे याकरता भारतात विक्री होणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये अलर्ट फीचर बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना तसे आदेश दिले आहेत. त्याबाबतची चाचपणी करण्यासाठीच आज अनेकांच्या अँड्राईड मोबाईल्सवर अलर्ट मॅसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात आपल्या विभागात काही एमर्जेन्सी सूचना द्यायच्या असतील, तर आपल्याला अशा प्रकारचा एक आपात्कालीन अलर्टचा मेसेज येऊ शकतो. या मेसेमद्वारे तुमच्यापर्यंत विशिष्ट माहिती केंद्र सरकार पोहोचवू शकतं.

हा मेसेज कोणाला आला असेल तर घाबरायचे करण नाही
तसेच आपल्या परिसरात किंवा शहरात काही घटना घडली किंवा काही emergency असेल किंवा काही अलर्ट सरकारला द्यायचे असतील त्यासाठी हे कामात येईल. म्हणून सध्या ह्या सिस्टिम ची टेस्टिंग चालू आहे म्हणून असे नोटिफिकेशन येऊ शकतात. त्या मुळे कोणी घाबरु नये.

ब्रिटनमध्येही झाली होती अशीच चाचणी
टेलिकम्युनिकेशन विभागाने आज पाठवलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता. त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही. याआधी देखील एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी ‘कीप काल्म अँड कॅरी ऑन’ असा संदेश यूकेमधील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button