India

आरोग्याचा मुलमंत्र…डोळ्यांची काळजी

आरोग्याचा मुलमंत्र…डोळ्यांची काळजी

वाढत्या वयासोबत डोळ्यात बदल येऊ लागतात. ज्यामुळे हळूहळू दृष्टी कमजोर होऊ लागते. याशिवाय तरुण वयातील लोकांमध्ये अधिक काळापर्यंत मोबाईल, लॅपटॉप व टीव्ही स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांची नजर कमी होऊ लागते. परंतु जर आहारात पौष्टिक पदार्थ आणि योग्य जीवनशैली अवलंबली तर डोळ्यांची काळजी घेता येते आणि डोळ्यांची नजर कमी होण्याची समस्या देखील टाळता येते.

• नजर कमी होण्याची लक्षणे

कोणतीही गोष्ट वाचताना अंधुक दिसणे व योग्य पद्धतीने वाचू न शकणे.

दूरच्या वस्तू पाहणे कठीण होणे.

डोळ्यात नेहमी दुखणे.

कमी प्रकाश आणि अंधुक दिसणे.

वाचतांना डोके दुखणे.

डोळ्यातून पाणी निघणे.

डोळ्यात सूज येणे डोळे लाल होणे.

डोळ्यात जळजळ आणि खाज येणे.

• डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय

१) गाजर आणि गाजरचा ज्यूस
डोळ्यांची दृष्टी तेज करण्यासाठी

गाजर खूप उपयुक्त आहे. गाजर मध्ये बीटा कॅरोटीन असते. जे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करते. गाजर शिवाय संत्री, लिंबू आणि इतर कट फळांमध्ये बीटा कॅरोटीन चे प्रमाण असते. म्हणून डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर व त्याच्या ज्युस सेवन करावा.

२) त्रिफला पावडर

त्रिफला चे पावडर डोळ्यांची नजर वाढवण्यात खूप सहाय्यक आहे. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी एक चमचा त्रिफला पावडर ला एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर पडू द्यावे. व दुसर्‍या दिवशी सकाळी या पाण्याला गाळून डोळ्यांवर मारावे. असे केल्याने एका महिन्यातच डोळ्यांची दृष्टी सुधारायला लागेल.

३) गरम हातांनी शेकणे

आपल्या दोन्ही हातांना एकमेकांवर हिवाळ्यात जसे घासतात तसे घासावे. दोन्ही हात गरम झाल्यावर हळुवार दोन्ही डोळ्यांवर ठेवावे. ही एक्सरसाइज केल्याने तुम्ही डोळ्यांवर आराम देणारी उष्णता अनुभव कराल. हातांना तोपर्यंत डोळ्यावर ठेवा जोपर्यंत डोळे पूर्ण उष्णता शोषून घेत नाही. जेव्हा हि तुम्हाला डोळे जळजळ वाटतील तेव्हा हा उपाय 4-5 वेळा करावा.

४) बदाम, अंजीर आणि किशमिश चे मिश्रण

6-7 बदाम, 2 अंजीर आणि 15 किशमिश घेऊन रात्रभर एक वाटी पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्याबरोबर खाली पोट हे बदाम, किशमिश आणि अंजीर खावेत. सुक्या मेव्यातील या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन असतात जे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button