Kolhapur

आदर्श सरपंच शुभांगी यशवंत परीट यांची गरूड भरारी.

आदर्श सरपंच शुभांगी यशवंत परीट यांची गरूड भरारी.

कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले

मडिलगे बुद्रुक ,ता.भुदरगड येथील महिला सरपंच सौ शुभांगी यशवंत परीट यांनी प्रत्यक्ष जनतेतून निवडून येऊन आपल्या कतृत्वाच्या जोरावार २०१९/२०सालचा गरूडभरारी फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त करून गरूड भरारी घेतली आहे.
त्यांना हा पुरस्कार खासदार धैर्यशील माने,आमदार चंद्रकांत जाधव ,महापौर सूरमंजिरी लाटकर,शारंगधर देशमुख ,दादासाहेब लाड,प्रा डॉ चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते तर मुख्य संपादक अनिल चव्हाण,सुनिल चव्हाण ,रविंद्र मोरे यांच्या उपस्थीतीत प्राप्त झाला.
शुभांगी परीट यांनी प्रथमच मडिलगे गावात महिला सरपंच होणेचा मान मिळाला.त्यांना त्यांचे पती यशवंत परीट,दिर दत्ताजीराव परीट,महेश परीट आई सुनिता लोखंडे,वडिल सूर्याजी लोखंडे,भाऊ अनिल लोखंडे,सासरे खंडेराव परीट यांची साथ मिळाली.त्यांनी आपल्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद,प्राथमिक शाळा सुसज्ज करणे या कामी महत्वाचे प्रयत्न केले.सपूर्ण गावात गटारीचे बाधकाम करणे,सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे.दौलत विदया मंदिर ते खिंड रोड डाबरीकरण करणे.नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रधान मंत्री घरकुल आवास योजना व रमाई आवास घरकुल योजनेजून बेचाळीस घरकुलांचे काम पूर्ण केले.केंद्रशासनाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गावात राबविली.
गावातील बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेवून महिला सक्षमीकरण करण्यावर विशेष भर दिला.गावातील प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या हिरेरीने सहभाग घेतात.त्यांचा गावामध्ये तरूण मुलांना व्यसनापासून अलिप्त ठेवण्यासाठी तसेच गावामध्ये शांतता व एकी राहणेसाठी भर आहे.या सर्वं कार्याची दखल घेवून हा आदर्श राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार त्यांना प्राप्त झाला .त्यांना या सर्व कार्यामध्ये आमदार प्रकाश आबीटकर ,दत्तात्रय उगले,नंदकुमार ढेगें,शिवाजी ढेगें,उपसरपंच महिन्द्रं देसाई,सर्व पुरूष,महिला सदस्य व ग्रामविकास अधिकारी गणपतराव आरडे व गावातील सर्व नागरीक यांचे सहकार्य मिळाले.त्यांना शुभेच्छा देणेसाठी नंदकुमार ढेंगे,संजय देसाई,अभिजीत देसाई,युवराज सुर्वे ,बाबूराव कांबळे,बाळासो देसाई,संदिप उगले,गणपतराव आरडे,रणजीत ढेंगे,नामदेव परीट,मकरंद सोनार,मगंल कळके,रूपाली भोसले,सुजाता बिरबोंळे सर्व गावातील बंधू भगिनी हजर होते.
भविष्यात राष्ट्रीय पुरस्कार मिळवून मडिलगे गावचे नाव देशात नेणेचा मानस त्यांनी व्यक्त केला.
त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button