Nashik

सिन्नर फाटा कारची दुचाकीला धङक,उड्डाणपूलावरून खाली पडुन पत्नी जागीच ठार ,पती गंभीर जखमी,

सिन्नर फाटा कारची दुचाकीला धङक,उड्डाणपूलावरून खाली पडुन पत्नी जागीच ठार ,पती गंभीर जखमी

शांताराम दुनबळे

नाशिक-नाशिकरोङ येथे उड्डाणपूलावरून जाणार्या दुचाकी एम एच 01ऐवाय ३५५९ हिस पाठीमागुन कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील पागधरे याची पत्नी उड्डाणपूलावरून खाली पडुन जागीच ठार झाली तर पती पागधरे गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक रोङ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि १७रोजी सकाळी ११वाजेच्या सुमारास प्रा .प्रसाद लक्ष्मण पागधरे वय ३४वर्षे रा.हरी संस्कृती अपाटॅमेन्ट चेहङी पंपीग परिसरात खजुॅल मळा हे पत्नी निता प्रसाद पागधरे वय वर्षे 33याच्या सह दुचाकी एम एच 01ए वाय ३५५९ नाशिक रोङ येथील काम आटोपून वीर सावरकर उड्डाणपूलावरून चेहङी कङे जात असताना पाठीमागुन नाशिक हुन सिन्नर कङे जाणार्या मारूती कारने एम एच १५आर ४६३० ने जोरदार धडक दिल्याने पती पत्नी उड्डाणपूलावरून थेट खाली कोसळले.

यात निता पागधरे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद पागधरे हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पलायन करणार्या कारचा पोलीसांनी पाठलाग केला असता कारचालक कार सोङुन फरार झाला आहे प्रसाद पागधरे हे बी वाय के महाविद्यालयात प्राध्यापक असुन पागधरे दांपत्याला एक दहा वर्षाची मुलगी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button