अहमदनगर

चिचोंडी-मांडवा-तिसगाव रस्त्याच्या निक्रुष्ट कामाची गुणवत्ता तपासणी करावी म्हणून चिचोंडी येथे सर्व पक्षिय रास्ता रोको आंदोलन

चिचोंडी-मांडवा-तिसगाव रस्त्याच्या निक्रुष्ट कामाची गुणवत्ता तपासणी करावी म्हणून चिचोंडी येथे सर्व पक्षिय रास्ता रोको आंदोलन

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मांडवे-राघोहिवरे-चिचोंडी या पंधरा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे साडेसहा कोटी रुपयांचे काम मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ३०/७/२०१८ ते २९/७/२०१९ या कालावधीत पुर्ण केले आहे.आणि ठेकेदाराला सर्व बील अदाकेले आहे.या रस्त्याचे काम सुरु असताना ठेकेदाराला अनेक सुचना केल्या होत्या पण जाणिव पुर्वक या सुचनांचे पालन न करता अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी कामे अर्धवट आवस्थेत दिसत आहेत.मांडवा नदिवर पुल न बांधता नुसता मातीच्या भरावाने दगड माती टाकून रस्ता केला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे, चर, तसेच आहेत,पुलाची कामे थातुरमातुर केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसत आहे. संबंधीत ठेकेदार, व अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी असे पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकाचे म्हणणे होते. कनिष्ठ अभियंता महेंद्र मुंगसे यांनी काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आंबादास डमाळे, घनश्याम जर्हाड,भागवान गीते,मोहनराव पालवे,यांची भाषणे झाली. या आंदोलनात भगवान फुलमाळी,विजय आव्हाड, प्रल्हाद आव्हाड,बाबाजी पालवे, दिलिप वांढेकर,रामनाथ शिरसाठ, सचिन कांबळे, तुकाराम कुमावत,पोपट आव्हाड,संतोष आव्हाड, रावसाहेब जाधव,बाबाजी गीते,दिलिप गोरे,राजेंद्र आव्हाड,सुरेश गीते सह पंचक्रोशीतील अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button